‘म्हैसाळ’च्या पंपांची संख्या वाढवली
‘म्हैसाळ’च्या पंपांची संख्या वाढवली 
मुख्य बातम्या

‘म्हैसाळ’च्या पंपांची संख्या वाढवली

टीम अॅग्रोवन

सांगली ः म्हैसाळ योजनेसाठी पाणी उपसा करणाऱ्या पंपांची संख्या बारावर पोचली आहे. पंपगृह क्रमांक चारमध्ये पंप सुरू करण्यात आले. कवठेमहांकाळ कालव्याच्या ५६ व्या किलोमीटरपर्यंत पाणी पोचल्यानंतर शाखा कालव्यांत पाणी सोडले जाणार आहे. पाणी आल्याने शेतकरी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढे असून १२ लाख रुपये शेतकऱ्यांनी भरले आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून मंगळवारी (ता. २) पाणी उपसा सुरू झाला. पाणी पुढे सरकण्याची गती खूप मंद आहे. ‘म्हैसाळ’मध्ये नदीकाठी चार पंप पाणी उपसा करीत आहेत. नरवाडला दुसऱ्या पंपगृहात पाच, तर बेडगमध्ये हुलेगिरी फाटा येथे तिसऱ्या पंपगृहात तीन पंप सुरू झालेत. आरगमध्ये लांडगेवाडी येथे चौथ्या पंपगृहात पाणी पोचले. टप्प्याटप्प्याने पुढे देण्यात येत असल्याने पहिल्या पंपगृहात पंपांची संख्या वाढवली नाही. चौथ्या पंपगृहातील पंप वाजता सुरू केले जाणार होते; मात्र विजेच्या समस्या उद्‌भवल्याने पंप सुरू झाले नाहीत. सलगरे येथील पाचव्या पंपगृहात पाणी पोचण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर पाणी पुढे जाईल. 

म्हैसाळ उपास सिंचन योजनेचे आवर्तन सुरू झाले, मुख्य कालव्यातून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी उपसा सुरू केला आहे. भोसे (ता. मिरज) गावातून आठ लाख रुपये भरले. मालगाव (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी चार लाख रुपये पाणीपट्टी पाटबंधारे विभागाकडे वर्ग केली आहे. गोळा झाले.  पाणी मुख्य कालव्यातून वाहू लागले आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा हा प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. सध्या पाणी गती कमी असल्याने शाखा कालव्यांतून पाणी सोडलेले नाही. कवठेमहांकाळ कालव्याच्या ५६ व्या किलोमीटरपर्यंत पाणी पोचल्यानंतर शाखा कालव्यांत पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे शाखा कालव्यांतून देखील पाणी शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन आणि बचत करावी, असे देखील पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.

पाणीपट्टी वसुलीसाठी बैठका  योजनेचे आवर्तन सुरू झाले आहे. पाणीपट्टी वसूल करणे हा मुख्य हेतू पाटबंधारे विभागाने ठेवला आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाने कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्‍यांतही अधिकारी शेतकऱ्यांच्या बैठका घेत आहेत. यातून पाणीपट्टी भरा, असे देखील आवाहन केले जाते आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT