Nashik Market Committee closed for three days from today
Nashik Market Committee closed for three days from today 
मुख्य बातम्या

नाशिक बाजार समिती आजपासून तीन दिवस बंद

टीम अॅग्रोवन

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवटी मुख्य बाजार आवारात कोरोना संक्रमित दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून बाजार समिती आज (ता.२६) ते गुरुवार (ता.२८) दरम्यान ३ दिवस बंद राहील. या दरम्यान बाजारातील व्यवहार बंद राहतील, असे बाजार समितीने जाहीर केले आहे. 

नाशिक बाजार समितीमध्ये जिल्ह्याभरातून शेतकरी येत असतात. येथे दोन कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे. त्यातच मुंबई व उपनगरातील अनेक भागात रेड झोन असताना येथील अनधिकृत खरेदीदार बाजारात भाजीपाला खरेदीसाठी येतात. त्यामुळे मोठी गर्दी होत होती.

ग्रामीण भागातील येणाऱ्या शेतकऱ्यांमार्फत प्रादुर्भाव वाढण्याचा गंभीर धोका आहे. त्यामुळे बाजार समितीच्या व्यापारी, हमाल व व्यापारी गटातील संचालकांनी सभापती व सचिवांना बाजार समिती बंद ठेवण्याबाबत सोमवारी (ता.२५) समिती प्रशासनाला पत्र दिले. त्यानुसार बाजार समितीने कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 

बाजार समिती बंद ठेऊन संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करणे, संसर्गाची साखळी तोडणे महत्वाचे आहे. पंचवटी मुख्य बाजार आवार व पेठ रस्त्यावरील शरदचंद्र पवार बाजार आवार ३ दिवस बंद ठेवण्याचे जाहीर केले. बाजार समितीत येणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीच्या सचिवांनी पत्राद्वारे केले.  व्यापारी, हमाल व मापारी गटातील संचालकांच्या मागण्या 

  • विना पास धारकास बाजार समितीत प्रवेश नको 
  • बाजार समितीत येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रिनिंग व्हावी. 
  • मुंबई, ठाणे, मालेगाव या परिसरातील वाहनांना बाजार समितीत प्रवेश देऊ नये 
  • त्यासाठी तातडीने निर्णय घ्या    
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT