दूध नेणाऱ्या वाहनांवर नांदेडमध्ये दगडफेक
दूध नेणाऱ्या वाहनांवर नांदेडमध्ये दगडफेक 
मुख्य बातम्या

दूध नेणाऱ्या वाहनांवर नांदेडमध्ये दगडफेक

टीम अॅग्रोवन

नांदेड ः दूध बंद आंदोलनाअंतर्गत मंगळवारी (ता. १७) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. गरिबांना मोफत दूधवाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरवाढ करेपर्यंत दूधविक्री न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील दूध संकलन बंद होते. शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी, हिंगोलीतील दूध संकलन नियमित होते.

नांदेड जिल्ह्यातील चैतन्यनगर येथे दूध घेऊन जाणाऱ्या शिवामृत डेअरीच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आल्यामुळे वाहनांचे नुकसान झाले. अर्धापूर येथे मोफत दूधवाटप करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील दूध संकलन नियमित होते. शीतकरण केंद्रावरून दूध घेऊन येणाऱ्या, तसेच परभणी येथून अन्य ठिकाणी दूध घेऊन जाणाऱ्या वाहनांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT