नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात अग्रेसर
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात अग्रेसर 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात अग्रेसर

टीम अॅग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५ हजार ३२९ प्रकरणात ५१६ कोटी ४९ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा मराठवाड्यात प्रथम, तर राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुद्रा बँक योजना समन्वय समितीची बैठक झाली. मुद्रा योजनेची प्रभावी अंमलबजावणी, प्रगती याचा आढावा डोंगरे यांनी घेतला. राज्यस्तरीय संनियंत्रण समितीचे सदस्य दिलीप कंदकुर्ते, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, आनंदराव ठेंगे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे चंदनसिंग राठोड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे, अशासकीय सदस्य बँकांचे प्रतिनिधींच्या सूचनांवर या वेळी निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी झालेल्या बैठकीत बँकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ द्यावा, असे स्पष्ट आदेश डोंगरे यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात हे कर्जवाटप झाले. गरजूंना त्रास न होता ताबडतोब कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या यशोगाथा इतर लाभार्थ्यांना माहिती करून द्याव्या. जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत. या मुद्रा बँक योजनेचा अधिकाधिक लाभ देण्यात यावा, अशीही सूचना डोंगरे यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT