कुंभारांना उत्पादने बनविण्याचे आधुनिक प्रशिक्षण
कुंभारांना उत्पादने बनविण्याचे आधुनिक प्रशिक्षण 
मुख्य बातम्या

कुंभारांना उत्पादने बनविण्याचे आधुनिक प्रशिक्षण

टीम अॅग्रोवन

नाशिक : प्रशिक्षणार्थींनी विजेवर चालणाऱ्या कुंभारी चाकावर कुंभारी काम करून विविध उत्पादने बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. उत्पादित वस्तूंची विक्री व्यवस्था, व्यवसायासाठी लागणारे अर्थसाह्य याबाबत प्रशिक्षणार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय, खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेतर्फे ‘कुंभारीकाम सशक्तीकरण मिशन' अंतर्गत कुंभार व्यवसायिकांसाठी आयोजित १० दिवसीय प्रशिक्षणाचा समारोप झाला. यात ४० प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला. खादी ग्रामोद्योग आयोगाचे मुंबई कार्यालयाचे कार्यकारी अधिकारी राजीव खन्ना, सहाय्यक कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर, नाशिक येथील खादी ग्रामोद्योग अधिकारी सीताराम दळवी, मातीकला विकास सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रेय कुंभार डाळजकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांना विजेवर चालणारे कुंभारी चाक, माती मळण्याचे मशीन नाममात्र दरात देण्यात आले.

खन्ना म्हणाले, ‘‘कुंभार समाजाचे शारीरिक कष्ट कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी यांत्रिकीकरण व आधुनिकीकरण करण्यावर शासनाचा भर आहे. माती भाजण्याच्या सध्याच्या पारंपारिक पद्धतीत जाळण्यात येणारे टायर व अन्य टाकाऊ वस्तूंमुळे प्रदूषण होते. पर्यावरणाची हानी होते. म्हणून यांत्रिकी चाक व माती मळण्याच्या मशीन बरोबर आता गॅसभट्ट्या निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.‘‘

कुंभार कामात विशेष योगदान देणाऱ्या ७८ वर्षीय किसन रसाळ,त्यांच्या पत्नी शांताबाई यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेचे संस्थापक मोहनराव जगदाळे, प्रदेश कार्याध्यक्ष रंगनाथ सूर्यवंशी, मार्गदर्शक सोमनाथ सोनवणे, वरिष्ठ कार्याध्यक्ष संतोष पाषाणकर आदी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT