संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

दूध दरवाढीबाबत दोषी दूधसंघांवर कारवाई करणार

विजय गायकवाड

मुंबई : शासनाच्या दूध दरवाढ हाणून पाडण्याचा कुटील डाव करणाऱ्या दूध संघांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले आहेत.

शासन आदेश अव्हेरणाऱ्या दूध संघांना नोटीस पाठविण्यात येणार असून काही संघांनी दरवाढ करून पुन्हा दर कमी केले आहेत, अशांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले. श्री. जाणकर म्हणाले, २१ जून २०१७ च्या शासन आदेशाने गायीचे दूध २७ रुपये तर म्हशीचे दूध ३६ रुपये प्रतिलिटर अशी एकूण ३ रुपये वाढ करण्यात आली होती.

सरकारने जाणीवपूर्वक ग्राहकांवर बोजा दिला नव्हता. तरी काही दूध उत्पादक संघांनी ही दरवाढ अद्यापही लागू केली नाही. तक्रारीनंतर अशा दूध संघांना नोटीस पाठविण्यात आल्या. तसेच ठरविलेल्यानुसार काही सहकारी दूध संघ दर देत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत, अशा सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मंत्री जानकर यांनी सांगितले. तसेच कारवाईबरोबरच कायदेशीर उपाययोजना करण्याचे प्रस्तावित असल्याचे जानकर म्हणाले.

शासनाच्या आदेशानंतरही दूध संघांनी दूध दरवाढ लागू केलेली नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सहकारी संस्था कलम ७९ अ नुसार अशा दोन सहकारी संस्थांवर सरकारने कारवाई केली आहे. जे दूध संघ शासन आदेशानुसार वाढीव दर लागू करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. - बी. एल. जाधव, सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध ), दुग्ध आयुक्तालय, मुंबई

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT