दूधदरवाढीच्या निर्णयाला हरताळ
दूधदरवाढीच्या निर्णयाला हरताळ 
मुख्य बातम्या

दूधदरवाढीच्या निर्णयाला हरताळ

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : राज्य शासनाने २१ जुलैपासून गायीच्या दूधाला प्रतिलिटर २५ रुपये दर द्यावा, असे आदेश देऊनही काही सहकारी दूध संघ वगळता इतर दूध संघांनी हा आदेश धाब्यावर बसविला आहे. काही संघांनी बैठका घेऊन एक ऑगस्टपासून या दूधदरवाढीबाबत निर्णय घेण्याचे ठरविले आहे. सहकारी संघांची तातडीची अंमलबजावणी पश्‍चिम महाराष्ट्रातील काही नामवंत व जास्त दूध संकलन असणाऱ्या दूध संघांनी शासनाने निर्णय जाहीर केल्या केल्या तातडीने निर्णय घेऊन दूधदराची अंमलबजावणी सुरू केली. यानुसार दूध संकलनही सुरू झाले. परंतु, राज्यातील अनेक दूध संघांनीही परस्पर बैठका घेऊन १ तारखेपासून या दराची अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेतला आहे. पण, याबाबत फारशी वाच्यता कुठेच झाली नाही. यामुळे या संघाचे कमी दरात दूध संकलन नियमितपणे सुरू आहे. 

दूध संकलनाबाबत माहिती घेण्याचे काम सुरू दूधदर आंदोलन मागे घेतल्यानंतर शासनाने बहुतांशी दूध संघांमध्ये आपले प्रतिनिधी पाठवून दूध संकलनाची माहिती संकलित करण्यास सुरवात केली आहे. राज्याकडे दुधाबाबत नेमकी माहिती नसल्याने निर्णय घेणे अवघड होत नसल्याने आता प्रत्येक दूध संघात प्रतिनिधी पाठवून दूध संकलनाची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. दूध संकलन किती होते. अतिरिक्त किती होते. ते कुठे पाठवले जाते याची माहितीही घेण्यात येत आहे. याचप्रमाणे विक्री करणारा व खरेदी करणाऱ्या दोघांची नोंदही एकाच वेळी घेतली जात आहे.  दूध दरवाढीच्या निर्णयाला हरताळ राज्यातील बहुतांशी दूध संघांनी अद्यापही जुन्या दरानेच खरेदी सुरू केली आहे. शासन संघांमध्ये भेदभाव करीत असल्याने या आदेशाची तातडीने पालन करणाऱ्या दूध संघाकडून तीव्र प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. २१ तारखेपासून दर का दिला नाही, हा दर न दिलेल्या संघांवर शासन कारवाई करणार का? हा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. दूध संघांच्या अंमलबजावणी अभावी शासनाने आदेश देऊनही लाखो दूध उत्पादकांचे दररोज नुकसान होत आहे. याबाबत दूध उत्पादकांतूनही संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.

आम्हाला माहितीच नाही आम्हाला पुरेशी माहिती नाही, याची अंमलबजावणी कशी करायची हे आम्हाला समजल्याशिवाय आम्ही जादा दराने दूध संकलन कसे करणार, असा सवाल जुन्या दराने दूध खरेदी करणाऱ्या एका संघाच्या प्रतिनिधीने व्यक्त केला. हा हिशोब कसा घालायचा याबाबत अद्याप आम्ही गोंधळात असल्याने आम्ही सरकारच्या आदेशाप्रमाणे अद्याप नव्या दराने दूध खरेदी सुरू केली नसल्याचे या दूध संघाच्या प्रतिनिधीने सांगितले.  दूध संघ प्रतिनिधींची आज मुंबईत बैठक दूधदरवाढीबाबत नेमकी अंमलबजावणी कशी करायची याबाबत शासनाने मुंबईत आज (ता. ३१) बैठक बोलाविली आहे. या बैठकीत संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारीही उपस्थित रहाणार आहेत. बैठकीतच दूध दरवाढ कशी अंमलात आणायची याबाबतचे मार्गदर्शन संघाच्या प्रतिनिधींना होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Rate : टोमॅटोचे दर उतरलेलेच, मेथीच्या दरात वाढ, पावसाचा भाजीपाला मार्केटवर असा परिणाम

Onion Export : कांदा निर्यात परवानगीवरून राजकारण तापले! शरद पवारांसह राऊत यांची मोदींवर घणाघाती टीका

Soil Nutrient Management : जमिनीमध्ये संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

Rabadi Production Industry : रबडी निर्मितीद्वारे मिळवला दरांचा योग्य मोबदला

Hapoos Mango Prices : हापूस आंब्याच्या दरात घसरण, वादळी पावसाचा परिणाम

SCROLL FOR NEXT