नाशिक बाजार समितीची बैठक काही मिनिटांत गुंडाळली
नाशिक बाजार समितीची बैठक काही मिनिटांत गुंडाळली 
मुख्य बातम्या

नाशिक बाजार समितीची बैठक काही मिनिटांत गुंडाळली

टीम अॅग्रोवन

नाशिक : बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे हे लाच घेण्याच्या प्रकरणात अडकल्यानंतर बाजार समिती संचालकांची बैठक गेल्या सोमवारी गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आली होती. ही बैठक पुन्हा गुरुवारी (ता. ५) बोलाविण्यात आली. मात्र, या बैठकीला लाच घेण्याचा आरोप असलेले सभापती शिवाजी चुंभळे उपस्थित होते. नंतर बैठक सुरू झाल्यानंतर बैठक अवघ्या काही मिनिटांत बैठक गुंडाळण्यात आली.

बैठकीला सत्ताधारी चुंभळे आणि विरोधात असलेल्या पिंगळे या दोन्ही गटांचे संचालक उपस्थित होते. मात्र, पिंगळे गटाच्या संचालकांना बाजू मांडू न दिल्याने उपसभापती युवराज कोठुळे आणि सचिव अरुण काळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी गटाच्या सात संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांची भेट घेऊन केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर कायम करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर जिल्हा उपनिबंधकांनी धोरणात्मक व आर्थिक व्यवहारासंबंधी कामकाजात सहभागी करून घेऊ नये, असे पत्र बाजार समिती सचिवांना दिले होते. या कामकाजात चुंबळे सहभागी झाले, तर त्याची जबाबदारी सचिवांवर राहील, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. त्यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. २) उपसभापती कोठुळे यांनी तातडीची बैठक बोलावली होती. 

ही बैठक चुंभळे यांच्यावर झालेली कारवाई; तसेच त्यांच्या सह्यांचे अधिकार काढल्यानंतर पुढील चर्चा करण्यासाठी बोलावली होती. मात्र, स्वत: उपसभापती कोठुळे व अन्य काही संचालक गैरहजर राहिल्याने बैठक तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब बैठक गुरुवारी (ता. ५) झाली. या बैठकीस दोन्ही गटांचे संचालक उपस्थित होते. उपसभापती कोठुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. त्या वेळी सभापती शिवाजी चुंभळेदेखील उपस्थित होते. मात्र, पुढे बैठक चालू होऊन काही वेळातच बैठक गुंडाळण्यात आल्याने संतप्त झालेल्या विरोधी गटाच्या संचालकांनी ही भूमिका घेतली आहे.

नेमका काय आहे आरोप?  सोमवारी (ता. २) तहकूब झालेली बाजार समितीच्या बैठकीत प्रोसिडिंग चुकीचे केले आहे. तसेच गुरुवारी (ता. ५) संचालकांच्या बैठकीत विरोधी गटाच्या संचालकांनी नोंदविलेल्या हरकती व मांडलेल्या विषयांची नोंद न करता सचिव अरुण काळे व उपसभापती युवराज कोठुळे यांनी मनमानी करून कारभार केला आहे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी संचालक प्रभाकर मुळाणे, रवींद्र भोये, संजय तुंगार, तुकाराम पेखळे, शंकर धनवटे, दिलीप थेटे, विश्वास नागरे यांनी स्वाक्षरीसह लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT