कृषी सहायकांना गावातच ‘बायोमेट्रिक’ सुरू करा
कृषी सहायकांना गावातच ‘बायोमेट्रिक’ सुरू करा 
मुख्य बातम्या

कृषी सहायकांना गावातच ‘बायोमेट्रिक’ सुरू करा

टीम अॅग्रोवन

पुणे : कृषी विभागाला गावाशी जोडणारे कृषी सहायक गावातच राहायला हवेत, मात्र ‘ते गावात येतच नाहीत’, ‘महिना महिना येत नाहीत’, ‘योजनांमध्ये भ्रष्टाचार होतो,’ ‘योजना पोचतच नाहीत’, ‘गावातच हजेरीसाठी त्यांना बायोमेट्रिक सुरू करा’, अशा तीव्र स्वरूपाच्या तक्रारी नेटकरी शेतकऱ्यांनी समाजमाध्यमांवर केल्या आहेत. याशिवाय कृषी सहायकांच्या रिक्त जागा भरण्याचे आवाहनदेखील केले आहे.  राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (ता. ५) अकोला येथे कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत,‘कृषी सहायकांनी आठवड्यात किमान तीन दिवस गावात गेलेच पाहिजे. कृषी विभागाचे कर्मचारी आमच्या गावात येऊन योजनांची माहिती देतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या बैठकीची बातमी ॲग्रोवन फेसबुक पेजवर प्रसिद्ध होताच. नेटकरी शेतकऱ्यांनी तत्काळ त्यावर प्रतिक्रिया देत ‘कृषी विभागाला गावाशी जोडणारे कृषी सहायक गावातच रहायला हवेत असा आग्रह धरताना, मात्र ‘ते गावात येतच नाही’, ‘महिना महिना येत नाही’, अशा तीव्र स्वरूपाच्या तक्रारी केल्या आहेत. तसेच कृषी सहायकांच्या रिक्त जागा भरण्याचे आवाहन देखील केले आहे.   नेटकऱ्यांनी व्यक्त केले मुद्दे...

  • पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक कृषी सेवक दुपारपर्यंत घरीच असतात आणी नंतर जाऊन सही करतात
  • काही उपयोग नाही, दलालगिरी जोपर्यंत संपत नाही तो पर्यंत सुधारणार नाहीत
  • खाऊगिरी जो पर्यंत आहे तो पर्यंत हे असेच चालू राहणार
  • रिक्त जागा पण भरणे तेवढच जरुरीचे आहे, तीन दिवस कशाला ७ दिवस गावात हवेत.
  • घरी बसून सर्व योजना चालवल्या जातात, खोटी कागदपत्रे जमा केली जातात
  • बोगस लाभार्थी तयार करून गावातली काही राजकीय बेंड व हे अधिकारी सर्व योजनांचा पैसा खातात 
  • आमच्या घनसावगी तालुक्यात ७०-८० टक्के जागा रिक्त आहेत, भरती करा
  • महिना महिना भर गावात येत नाही मग आठवड्याची गोस्ट अलगच
  • गावात जाऊन योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, नुसते येऊन काय फायदा
  • कृषी अधिकारी कोण आहे तोच माहीत नाही गावाला  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

    Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

    Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

    Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

    Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

    SCROLL FOR NEXT