मका भुशाला तीन हजारांचा भाव
मका भुशाला तीन हजारांचा भाव 
मुख्य बातम्या

मका भुशाला तीन हजारांचा भाव

टीम अॅग्रोवन

जायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच हिवाळ्यात पाणी आणि चाराटंचाई जाणवत आहे. पशुधन जगवावे कसे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना सतावत आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील शेतकरी पशुधन वाचविण्यासाठी मक्‍याचा तीन हजारांच्या भावात भुसा खरेदी करून ठिकठिकाणी गंजी घालतानाचे चित्र आहे.

बहुतांश शेतकऱ्यांनी शेतात मक्‍याच्या रचलेल्या गंजी दोन ते तीन हजार रुपये व ट्रॅक्‍टरचे भाडे चार हजार असा एकूण सात ते आठ हजार रुपये खर्च केला आहे. पशुधन वाचविण्यासाठी आता पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची अशी धडपड  सुरू आहे. 

चारा छावण्यांची गरज दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन शासनाने त्वरित चारा छावण्या सुरू करण्याची गरज आहे. तालुक्‍यात पाणीसाठा खालावत चालला असून, त्वरित गावोगावी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. तसेच दुष्काळी उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करावी. मजूर, महिला, शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करण्याची मागणी केली जात आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT