थकीत वीजबिलांच्या वसुलीचा आदेश; महावितरणचा ग्राहकांना झटका
थकीत वीजबिलांच्या वसुलीचा आदेश; महावितरणचा ग्राहकांना झटका 
मुख्य बातम्या

थकीत वीजबिलांच्या वसुलीचा आदेश; महावितरणचा ग्राहकांना झटका

वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाकाळात थकलेल्या वीजबिलांच्या वसुलीचा आदेश महावितरणने शनिवारी अधिकाऱ्यांना दिला. राज्य सरकार वाढीव बिलांबाबत दिलासा देणार, अशा अपेक्षेत गेले काही महिने असलेल्या जनतेचा ऐन दिवाळीत भ्रमनिरास झाला आहे. या निर्णयामुळे आता ग्राहकांना थकीत रक्कम भरावी लागणार आहे. महावितरणचे राज्यभरात ९८ लाख पाच हजार ५८४ ग्राहक आहेत. त्यापैकी ६४ लाख ५२ हजार ग्राहकांनी बिले भरलेली नाहीत. त्यामध्ये औरंगाबाद विभाग आघाडीवर आहे. आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने महावितरणने थकीत रक्कम वसूल करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला आहेत. ऊर्जामंत्र्यांनी ग्राहकांना दिवाळीपूर्वी दिलासा देण्याचे विधान केले होते; मात्र अजूनही ग्राहकांना सरकारकडून दिलासा मिळाला नाही. राज्य सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक ग्राहकांनी वीजबिले भरली नाहीत. त्यामुळे महावितरणला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांनी वीजबिल न भरल्यास राज्यातील जनतेला अखंडित वीजपुरवठा करणे कठीण होणार आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसूल करण्याची मोहीम पुन्हा हाती घेतली आहे. त्यानुसार महावितरणने वीजबिल वसुलीसंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.

परिपत्रकातील सूचना

  • वसुलीची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर.
  • ग्राहकांना टप्प्याटप्प्याने वीजबिल भरण्याची मुभा.
  • वाढीव बिलाबाबत सवलत मिळणार नाही.
  • वाढीव वीजबिलाबाबत ग्राहकांना माहिती द्यावी. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Food distribution system : अन्नधान्याची सार्वजनिक वितरण प्रणाली

    Bhendwal Ghatmandni : दिल्लीच्या तख्तापासून शेतकऱ्यांच्या पीक पाण्यापर्यंत भेंडवळच भाकीत आलं समोर

    Maharashtra Politics : शेती आणि आरक्षणाचे विषय लोकसभेत आम्ही सातत्याने मांडले : सुप्रिया सुळे

    Onion Rate : नगर जिल्ह्यात कांदादर पडल्याने शेतकऱ्यांचा संताप

    Tomato Crop Disease : टोमॅटो पिकातील ‘जिवाणूजन्य मर’

    SCROLL FOR NEXT