महाराष्ट्र सर्वाधिक उष्ण राज्य
महाराष्ट्र सर्वाधिक उष्ण राज्य 
मुख्य बातम्या

महाराष्ट्र सर्वाधिक उष्ण राज्य

Amol kutte

पुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने देशात महाराष्ट्र राज्य आणि पूर्व विदर्भाचा भाग सर्वांत उष्ण ठरत आहे. महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा, राजस्थान राज्यांत अनेक ठिकाणी उन्हाचा चटका वाढला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भासह सर्वंच ठिकाणी तापमान सरासरीच्या वर गेले होते; तर २१ एप्रिल रोजी चंद्रपूर येथे हंगामातील उच्चांकी ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.  महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरातमधील सौराष्ट्र, कच्छ, तेलंगणामध्ये बहुतांशी ठिकाणी, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडूमध्ये काही ठिकाणी; तर बिहार, ओरिसा राज्यात काही ठिकाणी तापमान चाळिशीपार गेले आहे. उर्वरित भारतात बहुतांशी ठिकाणी तापमान ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, तेलंगणाचा उत्तर भाग देशात सर्वाधिक तापला आहे. 

राज्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राज्यातील तापमानाचा विचार करता, एप्रिल महिन्यात विदर्भात सरासरी ४०.९ ते ४२.२ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात ३९.१ ते ४१.३ अंश, मध्य महाराष्ट्रात ३७.२ ते ४१.९ अंश आणि कोकणात ३१.९ ते ३३.० अंश सेल्सिअस तापमान असते. या महिन्यात विदर्भातील चंद्रपूर, मराठवाड्यातील नांदेड, मध्य महाराष्ट्रातील जळगाव आणि कोकणातील डहाणू, सांताक्रुझ येथील एप्रिलचे सरासरी तापमान सर्वाधिक आहे. यंदा राज्यात बहुतांशी ठिकाणी सरासरीपेक्षा १ ते ३.७ अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली आहे.  तापमान अधिक राहण्याचे पूर्वानुमान हवामान विभागाने ३ मार्च २०१८ रोजी मार्च ते मे या कालावधीतील उष्णतेचे पूर्वानुमान देताना या तीन महिन्यात कमाल तापमानात एक अशांपेक्षा अधिक वाढ हाेण्याची शक्यता वर्तविली होती. उन्हाचा चटका वाढून उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाजही वर्तविला होता. त्यानंतर १ एप्रिल रोजी उन्हाळ्याचा (एप्रिल ते जून) दिर्घकालीन अंदाजातही तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचे पुर्वानुमान दिले होते.  महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटा येण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे मे आणि जून महिन्यातही उन्हाचा चटका अधिक राहणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT