शेतकरी कर्जमाफी
शेतकरी कर्जमाफी 
मुख्य बातम्या

आठवड्यात ५० लाख अर्ज भरण्याचे आव्हान

मारुती कंदले

मुंबई  राज्य सरकारने कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शुक्रवारी (ता.१५) दुपारी बारापर्यंत ९९ लाख १ हजार ९६६ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन नोंदणी केली असून, सुमारे ५१ लाख ५१ हजार ६८४ शेतकरी कुटुंबीयांचे अर्ज भरून पूर्ण झाले आहेत. आता एका आठवड्यात राहिलेल्या सुमारे ५० लाख शेतकरी कुटुंबांचे अर्ज भरण्याचे आव्हान आहे. सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजेचे भारनियमन वाढले आहे. कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मिती थंडावली आहे. त्याचा मोठा परिणाम ग्रामीण महाराष्ट्रातील वीजपुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे इंटरनेट सुविधाही खंडित होण्याची शक्यता असून, येत्या आठवडाभरात अजूनही अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना मुदतीत कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून मुदतवाढीची शक्यता नसल्याने या कालावधीत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. 

दरम्यान, शिवसेनेने दसऱ्यापूर्वी कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची मागणी केली आहे; तर राज्य सरकार दिवाळीआधी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट देण्याच्या प्रयत्नात आहे. पुढील महिन्यात राज्यात सुमारे सात हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांचा मुहूर्त साधण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शुक्रवारी (ता.१५) दुपारी बारापर्यंत ९९ लाख १ हजार ९६६ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन नोंदणी केली असून सुमारे ५१ लाख ५१ हजार ६८४ शेतकरी कुटुंबीयांचे अर्ज भरून पूर्ण झाले आहेत. येत्या आठवडाभरात या संख्येत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांची छाननी करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा करण्यासाठी एक महिन्याहून कमी दिवस उरतात. पुढील महिन्यात १८ तारखेपासून दिवाळी सुरू होते. त्याआधी कर्जमाफीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारपुढे असणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT