कापूस वाणात महाबीज टाकणार 'बिजी टू' तंत्रज्ञान
कापूस वाणात महाबीज टाकणार 'बिजी टू' तंत्रज्ञान 
मुख्य बातम्या

कापूस वाणात महाबीज टाकणार 'बिजी टू' तंत्रज्ञान

टीम अॅग्रोवन

अकोला ः  महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ व परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठादरम्यान सामंजस्य करार झाला असून कपाशीचे दोन वाण शेतकऱ्यांसाठी २०२२ च्या हंगामात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वनामकृवि संशोधित असलेले कपाशी NHH २५० व NHH-७१५ या वाणांमध्ये महाबीजद्वारे 'बिजी टू' तंत्रज्ञान अंतर्भूत केले जाणार आहे.  महाबीज व वनामकृविमध्ये झालेल्या करारावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. वाराकर आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे तसेच दोन्ही संस्थांचे विभागप्रमुख, शास्त्रज्ञ प्रामुख्याने उपस्थित होते. कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सार्वजनिक संस्थांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी एकत्र येऊन कार्य करणे, आजच्या काळाची गरज झालेली आहे. याच धर्तीवर वनामकृवि आणि महाबीज यांच्यात नवीन संकरित कपाशी NHH २५० व NHH-७१५ या वाणांमध्ये महाबीजद्वारे 'बिजी टू' तंत्रज्ञान अंतर्भूत करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. संकरित कपाशी NHH-२५० व NHH-७१५ ही दोन्ही वाण कोरडवाहू लागवडीस योग्य असून 'बिजी टू' तंत्रज्ञान अंतर्भूत केल्यामुळे बोडअळ्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. हे दोन्ही वाण सन २०२२ मध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध होतील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT