बीटी बियाणे
बीटी बियाणे 
मुख्य बातम्या

महाबीज ५५ हजार बीटी बियाणे पाकिटे उपलब्ध करणार

टीम अॅग्रोवन

अकोला ः गेल्या काही हंगामापासून शेतकऱ्यांना उत्सुकता लागून असलेली महाबीजची बीटी कपाशी या हंगामात अखेर मिळणार आहे. या खरिपासाठी राज्यातील कापूस उत्पादकांना ५० ते ५५ हजार पाकिटे उपलब्ध करून देण्याची तयारी महाबीज प्रशासनाने केली जात आहे. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे वाण असलेल्या या कपाशीचे बीटी बियाणे महाबीजच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे.  पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचा ''पीकेव्ही हायब्रीड-२'' व वसंतराव नाईक विद्यापीठाचे वाण असलेले ''एनएचएच-४४'' यामध्ये ''बोलगार्ड-२'' चा अंतर्भाव करण्यात आला आहे. या वाणांचे बीजोत्पादन या हंगामात घेण्यात आले. या दोन्ही वाणांना केंद्र शासनाने मान्यता दिलेली असून राज्यानेही विपणनाकरिता यापूर्वीच मंजुरी प्रदान केलेली आहे. या वाणांचे प्रायोगिक तत्त्वावर बीजोत्पादन कार्यक्रम करण्यात आलेले असून त्याद्वारे प्राप्त झालेले संकरीत बियाणे हंगामात उपलब्ध करून दिले जात आहे. दोन वर्षांपूर्वी कापूस पिकावर आलेल्या बोंडअळीने शेतकरी उद्ध्वस्त झाला होता.  शासकीय यंत्रणांनी केलेली जनजागृती, शेतकऱ्यांनी घेतलेली काळजी यामुळे गेल्या हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात रोखता आला होता. त्यातच इतर पिकांच्या तुलनेत कापसाचे उत्पन्न बऱ्यापैकी झाले. कापसाचा दरही चांगला मिळाल्याने शेतकरी येत्या हंगामात कापूस लागवडीकडे आणखी झुकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पहिल्यांचाच कापसाचे बीटी वाण देत असलेल्या महाबीजच्या या दोन्ही वाणांच्या उपन्न तसेच रोगप्रतिकार क्षमतेविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. काही वर्षांपूर्वी हे दोन्ही वाण शेतकऱ्यांच्या पसंतीचे होते.  बीटी वाण प्रचलित झाल्यानंतर तेक काळाच्या ओघात मागे पडले. आता या वाणांमध्येच बीटी जीन टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो याबाबत उत्सुकता आहे. महाबीज या हंगामात हे दोन्ही वाण सध्या असलेल्या प्रचलित दराने देणार की, त्यासाठी सवलत दिली जाते, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT