अकोला जिल्ह्यात ४४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
अकोला जिल्ह्यात ४४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान 
मुख्य बातम्या

अकोला जिल्ह्यात ४४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

अकोला  ः जिल्ह्यात रविवारी (ता. २) आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे प्राथमिक अंदाजानुसार, सुमारे ४४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दोन तालुक्यातील २६ गावांमध्ये पाऊस, गारपिटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, करडई, कांदा पिकांचे नुकसान झालेले आहे.  रविवारी जिल्ह्यात बार्शीटाकळी आणि पातूर तालुक्यांत वादळी पाऊस झाला होता. ग्रामीण भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला. याचा शेतातील पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटाला सामोरे जावे लागले. पाऊस व वादळामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाल्यासह लिंबू, आंबा या फळपिकांचे अवकाळी व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे लिंबाच्या बागांमध्ये फळांचा सडा पडलेला दिसून आला. त्यासोबत आंब्याच्या झाडाला लागलेल्या कच्च्या कैऱ्यासुद्धा वारा आणि पावसामुळे जमिनीवर पडल्या. कृषी सहायकांसह तलाठ्यांनी सोमवारी नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी केली. यादरम्यान अवकाळीमुळे बार्शीटाकळी तालुक्यातील १३ गावांत २१५ हेक्टरवरील गहू पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. पातूर तालुक्यातही ११ गावात २३३ हेक्टरवरील गव्हाला याचा फटका बसला.  बार्शीटाकळी व पातूर तालुक्यात शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे त्याचे पंचनामे करण्याचे काम केले जात आहे. तलाठ्यासह ग्रामसेवक व कृषी सहायक नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून  अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणार आहेत. त्यानंतर नुकसानग्रस्तांना मदतीबाबतची मागणी शासनाकडे करण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT