कर्जमाफी योजना
कर्जमाफी योजना 
मुख्य बातम्या

आॅनलाईन अर्ज न करताच व्याज सवलतीचा लाभ

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जिल्ह्यात ऑनलाइन अर्ज न करता कर्जात २५ टक्के सवलतीचा यावल व जळगाव तालुक्‍यांतील नियमित कर्जदार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. तसेच २०१७ मधील थकबाकीदार असलेल्या एका शेतकऱ्यालाही कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचा प्रकार यावल तालुक्‍यात घडला असून, हा सावळा गोंधळ निस्तरण्यासाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षण शाखेची सारखी सर्कस सुरू आहे.  ज्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले, असे अनेक नियमित कर्जदार २५ टक्के सवलतीपासून वंचित आहेत. परंतु ज्यांनी अर्ज केले नव्हते, अशा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना २५ टक्के सवलतीचा लाभ मिळाल्याचे प्रकार यावल तालुक्‍यातील भालोद, बामणोद, पाडळसा येथील विविध बॅंकांच्या शाखांमध्ये घडले आहेत. भालोद येथील एका शेतकरी २०१७ मधील थकीत कर्जदार आहे. याच शेतकऱ्याचे २०१४ मध्ये अन्य एका बॅंकेचे पीक कर्जही थकले होते. या शेतकऱ्याचे २०१७ मधील व २०१४ मधील थकीत कर्ज माफ झाले आहे. म्हणजेच दोन बॅंकांचे कर्ज माफ झाले आहे.  जळगाव तालुक्‍यातील धानवड येथील चार शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या यादीत दोनदा नावे आली असून, त्यांनाही दोनदा लाभ मिळत असल्याचे सहायक निबंधक कार्यालयाच्या लक्षात आले. हा घोळ निस्तरण्यासाठी सुमारे आठ हजार शेतकऱ्यांच्या यादीचे लेखापरीक्षण सुरू आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन अर्जासोबत जुळत नाही, त्या संदर्भात संबंधित शेतकऱ्याकडून माहिती घेऊन दुरुस्ती केली जात आहे. त्यांना सहायक निबंधक कार्यालयाकडे बोलाविण्यात आले आहे.  नियमित कर्जदारांच्या यादीचा घोळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या दगडी बॅंकेतील खातेदार असलेल्या अनेक नियमित कर्जदार शेतकऱ्यांना २५ टक्के सवलतीचा लाभ मिळालेला नाही. मध्यंतरी नियमित कर्जदार शेतकऱ्यांची नावे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या यादीत आली. ही यादी सहायक निबंधक कार्यालयाकडे पुन्हा परत पाठविण्यात आली.  प्रतिक्रिया दुबार कर्जदारांची नावे शोधण्यात येत असून, सुटीच्या दिवशीही आमचे कामकाज सुरू आहे. अनेक नावे शोधली आहेत. नियमित कर्जदारांची नावे ग्रीन यादीत समाविष्ट केली जातील.  - अशोक बागल, सहायक, जिल्हा उपनिबंधक, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT