निविष्ठांमध्ये शेतकऱ्यांना फसविल्यास परवाने रद्द आणि गुन्हे दाखल होणार 
निविष्ठांमध्ये शेतकऱ्यांना फसविल्यास परवाने रद्द आणि गुन्हे दाखल होणार  
मुख्य बातम्या

निविष्ठांमध्ये शेतकऱ्यांना फसविल्यास परवाने रद्द आणि गुन्हे दाखल होणार 

टीम अॅग्रोवन

पुणे : कोरोना आणि लॉकडाऊनच्या स्थितीत त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा खते, बियाणे, कीटकनाशकांच्या विक्रीत पिळवणूक करण्याचा प्रयत्न करू नये; तसे झाल्यास विक्रेत्यांचे परवाने रद्द करूच पण फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाईल, असा कडक इशारा कृषी आयुक्तांनी दिला आहे.  कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडून आगामी खरिपातील पूर्वतयारीबाबत सतत आढावा घेतला जात आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना कामे वाटून देण्यात आली असून ऑनलाईन कामकाजामार्फत आयुक्तांकडून घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे. राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी आणि सहसंचालकांना दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.  आयुक्तांनी या अधिकाऱ्यांना बजावले आहे, ‘‘खरीप हंगाम जवळ येत आहे. त्यामुळे खते,बियाणे निविष्ठा योग्य त्या दरात उपलब्ध होण्यासाठी संबंधित निरीक्षकांना सूचना द्या. निविष्ठांच्या उपलब्धेत अडचणी येणार नाहीत किंवा जादा दराने विक्री, साठेबाजी होणार नाही याची काळजी घ्या. गैरप्रकार निदर्शनास आले तर निरीक्षकांनी तात्काळ कडक कारवाई करावी. यात परवान्यांचे निलंबन किंवा रद्द करण्याची कारवाई करावी’’  ‘अॅग्रोवन’शी बोलताना आयुक्तांनी, ‘‘यंदा आम्ही निविष्ठा उपलब्धता, गुणवत्ता व किमतीच्या बाबतीत गंभीर असल्याचे सांगून गैरप्रकार केल्यास फौजदारी कारवाई करण्याचे ठरविले आहे,’’ असे स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयाने बियाणे, खते, कीटकनाशकांच्या उत्पादकांनाही सूचना दिलेल्या आहेत. 

आयुक्तालयाकडून लक्ष  निविष्ठांच्या उत्पादन, वितरण, विक्री आणि साठवणूक अशा संपूर्ण साखळीवर आयुक्तालयाकडून लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी गुणनियंत्रण संचालक विजयकुमार घावटे व मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर यांच्याकडून सतत निरीक्षकांना सूचना दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT