in kumbhar Pimpalgaon area Rain damage to crops
in kumbhar Pimpalgaon area Rain damage to crops 
मुख्य बातम्या

कुंभार पिंपळगाव परिसरात पावसाने पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

कुंभार पिंपळगाव, जि. जालना : कुंभार पिंपळगावसह अरगडे गव्हाण (ता. घनसावंगी) परिसरात सोमवारी (ता.७) मध्यरात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.

चांगली वाढ झालेल्या कापसाच्या पिकाचे पाते, फुलोरा गळून पडला आहे. झाडे व फांद्या मोडून पडल्या आहेत. बागायती पिकात ऊस आणि केळीच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

बहरात आलेले आणि उंच वाढलेले ऊसाचे पीक भुईसपाट झाले आहे. आडव्या झालेल्या उसाच्या पिकांची साखर कारखाण्यांनी पाहणी करून गळीत हंगामाच्या सुरूवातीलाच या उसाची तोड करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT