कोल्हापूर जिल्ह्यात लाळ्या खुरकूतचा फैलाव
कोल्हापूर जिल्ह्यात लाळ्या खुरकूतचा फैलाव 
मुख्य बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात लाळ्या खुरकूतचा फैलाव

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात लाळ्या खुरकूत रोगाने थैमान घालण्यास सुरवात केली आहे. कागल, करवीरबरोबर शिरोळ तालुक्यातील हजारो जनावरे या रोगाने बाधित झाली आहेत. विशेष करून शिरोळ तालुक्यात मरतुकीचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी लसीकरण होऊन ही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.

लाळ्या खुरकूतची साथ दरवर्षी येत असून, यंदा त्याचे लसीकरण उशिरा झाले आहे. पण, वातावरणातील बदलामुळे ही साथ लवकर येऊन पसरत आहे. या साथीने जर्सी गाभण गायी व वासरांना लक्ष्य केले असून, त्यांचा बळी घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन आर्थिक घडी कोलमडली आहे. वातावरणातील बदलामुळे तसेच उत्पादकांनी पुरेशी काळजी न घेतल्याने ही साथ फैलावत असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ज्या ठिकणी प्रमाण जास्त आहे तिथे कारण शोधण्याचे काम वेगात सुरू असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.जनावरांच्या जखमेवर दिवसातून तीन वेळा औषध लावावे. जखम बरी होईपर्यंत हा उपचार करावा. तसेच, पौष्टिक आहार द्यावा. गोठा स्वच्छ ठेवावा. दगावलेली जनावरे पुरावीत, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. लागण झालेल्या जनावरांची तपासणी करून नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात करवीर, कागलमध्ये या रोगाचा फैलाव आहे. तिथे आम्ही नियंत्रण आणत आहोत. शिरोळमध्ये आम्ही पथके पाठवली असून लवकरच नेमक्या कारणाचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात येणार आहे. - डॉ. वाय. ए. पठाण, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT