अकोला ः येथील बाजार समितीच्या अावारात हमीभावाने मूग, उडीद खरेदी केंद्राच्या उद्घाटनाला उपस्थित जी. जी. माळवे, शिरीष धोत्रे आदी.
अकोला ः येथील बाजार समितीच्या अावारात हमीभावाने मूग, उडीद खरेदी केंद्राच्या उद्घाटनाला उपस्थित जी. जी. माळवे, शिरीष धोत्रे आदी.  
मुख्य बातम्या

मूग, उडीद खरेदी केंद्र उद्घाटनाच्या दिवशीच अाडवी अाली अार्द्रता

Gopal Hage

अकोला : शासन अादेशानुसार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मूग आणि उडीद हमीभाव खरेदी केंद्राचे शुक्रवारी (ता. १३) येथे उद्‍घाटन झाले. जिल्ह्याच्या इतर ठिकाणी केंद्र कार्यरत होणार अाहेत. मात्र सध्या धान्यामध्ये अार्द्रता १६ ते १७ येत असल्याने खरेदी केंद्र सुरू झाले तरी प्रत्यक्ष खरेदी मात्र नाममात्र झाली असल्याची माहिती मिळाली अाहे. शासन हमीभावाने एफएक्यू दर्जानुसार धान्याची खरेदी करीत असून, यासाठी धान्यात जास्तीत जास्त १२ पर्यंत आर्द्रता ग्राह्य धरली जाते.

सध्या मूग, उडीद तसेच सोयाबीनचा हंगाम सुरू झाला अाहे. बहुतांश ठिकाणी पावसामुळे धान्य अोले झाले अाहे, तर काही ठिकाणी वातावरणामुळे धान्यात अोलसरपणा वाढला. खुल्या बाजारात या धान्यांचे दर अचानक पडल्याने हमीभावाने खरेदीची सर्वत्र मागणी सुरू झाली होती. त्यामुळे शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. मात्र यासाठी शेतकऱ्यांना नावनोंदणी करण्याचे अादेश देण्यात अाले होते.

त्यानुसार ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात होती. अखेरीस शुक्रवारी अकोल्यात खरेदी केंद्राचा जिल्हा उपनिबंधक जी. जी. माळवे, जिल्हा पणन अधिकारी बजरंग ढाकरे, बाजार समिती सभापती शिरीष धोत्रे व इतरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

या वेळी विक्रीसाठी बोलविलेल्या शेतकऱ्यांचा बहुतांश माल हा अोलसर असल्याचे अाढळले. शेतमालातील अार्द्रता ही १६ ते १७ भरत असल्याचे सांगण्यात अाले. त्यामुळे प्रत्यक्षात जोमाने खरेदी मात्र सुरू झाली नव्हती. या खरेदी केंद्राची जबाबदारी बाजार समितीकडे देण्यात अाली असून, शेतकऱ्यांना एफएक्यू दर्जाचे धान्य विक्रीसाठी अाणण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.

नावनोंदणीची प्रक्रिया सुरू शासनाने केलेल्या अावाहनानुसार अकोला जिल्ह्यात साडेअकराशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मूग, उडीद विक्रीसाठी नावनोंदणी केली अाहे. नावनोंदणीची प्रक्रिया सुरू अाहे. पहिल्या दिवशी १० शेतकऱ्यांना बोलविण्यात अाले होते. अातापर्यंत अकोला तालुक्यात ४८०, अकोट ३३३, मूर्तिजापूर २०३, तेल्हारा ९८ अशी १११४ शेतकऱ्यांची गुरुवारपर्यंत नोंदणी झाली होती. नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याने त्यात अाणखी वाढ झाली अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT