राज्यात मराठा आरक्षण लागू
राज्यात मराठा आरक्षण लागू 
मुख्य बातम्या

राज्यात मराठा आरक्षण लागू

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, शनिवारपासून (ता. १) मराठा समाजासाठी आरक्षण लागू झाले आहे. राज्यपालांनी शुक्रवारी (ता. ३०) विधिमंडळाच्या कायद्याला मंजुरी देत सही केल्यानंतर काल तातडीने हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. शिक्षण व नोकरीत हे आरक्षण लागू झाले आहे. ज्या क्षणी राजपत्र प्रसिद्ध झाले त्याच क्षणापासून राज्यात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू झाले. बहुचर्चित मराठा समाज आरक्षण विधेयक गुरुवारी (ता. २९) राज्य विधिमंडळात एकमताने मंजूर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७८ महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधित किंवा अनुषंगिक बाबींची तरतूद करण्यासाठी विधेयक मांडत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर विधिमंडळात कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यातील सध्याच्या ५२ टक्के आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला १६ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आले. यामुळे मराठा समाजाला राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमध्ये नियुक्त्या आणि पदांमध्ये आरक्षण मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT