फलोत्पादन
फलोत्पादन  
मुख्य बातम्या

 देशात फलोत्पादन पिकांचे विक्रमी उत्पादन

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली: देशात फलोत्पादन पिकांचे उत्पादन यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढणार आहे. फळे आणि मसाले उत्पादनात वाढ होणार असल्याने २०१८-१९ मध्ये देशात विक्रमी ३१४.८७ दशलक्ष टन फलोत्पादन पिके उत्पादनाचा अंदाज आहे. हा आतापर्यंतचा उत्पादनाचा उच्चांक असेल, असे केंद्रीय कृषी विभागाने म्हटले आहे.  केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकताच फलोत्पादन पिके उत्पादनाचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात एक टक्क्याने वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देशात कमी पाऊस झाला असतानाही ३११.७१ दशलक्ष टन फलोत्पादन पिकांचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी देशात सरासरीच्या केवळ ९१ टक्केच पाऊस झाला होता आणि अनेक राज्यांमध्ये दुष्काळ आहे. नैसर्गिक आपत्ती असतानाही फलोत्पादन पिकांचे ३११.७१ दशलक्ष टन उत्पादन झाले होते.  कृषी विभागाने सुधारित अंदाजात यंदा फळे उत्पादन ९७.३८ दशलक्ष टन होणार असल्याचे म्हटले आहे. पहिल्या अंदाजात ९६.७५ दशलक्ष टन उत्पादन होणार असल्याचे म्हटले होते. पहिल्या अंदाजात मसाले उत्पादन ८.६१ दशलक्ष टन होणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता. सुधारित अंदाजात ८.५९ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. सुधारित अंदाजात मसाले उत्पादन घटणार असल्याचे म्हटले आहे. सोबतच भाजीपाला उत्पादनातही घट होऊन १८७.४७ दशलक्ष टनांवरून १८७.३७ दशलक्ष टन उत्पादन होणार असल्याचे म्हटले आहे. बटाटा उत्पादनात वाढ केंद्रीय कृषी विभागाने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजात कांदा आणि बटाटा उत्पादनात वाढ दर्शविली आहे. पहिल्या अंदाजात कांदा उत्पादन २३.६१ दशलक्ष टन होणार असल्याचे म्हटले होते. सुधारित अंदाजात २३.२८ दशलक्ष टन उत्पादन होणार असल्याचे म्हटले होते. बटाटा उत्पादन ५२.५९ दशलक्ष टनांवरून ५२.९६ दशलक्ष टन होणार असल्याचे म्हटले आहे. मसाल्यामध्ये मिठ, मिरची, लाल मिरची, हळद आणि आले उत्पादन वाढणार आहे, तर आले आणि धने उत्पादन घटणार आहे, असे सुधारित अंदाजात स्पष्ट केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT