हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर उलाढाल
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर उलाढाल 
मुख्य बातम्या

हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर उलाढाल

सकाळ वृत्तसेवा

बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे बाजार मंगळवारी (ता. २२) गर्दीने फुलून गेला. आगामी खरीप हंगाम आणि कारखान्यावरील ऊस वाहतुकीच्या तयारीसाठी आतापासूनच बैलांची खरेदी-विक्री वाढली आहे. बाजारात अडीचशेवर बैलजोड्या, तसेच दोनशेवर म्हशी व गायींची खरेदी-विक्री झाली. यातून चार कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाली. हिरापूर येथे अनेक वर्षांपासून मंगळवारी आठवडे बाजार भरतो. सिंदफणा नदीकाठी असलेले हे गाव धुळे-सोलापूर रोडवर असल्याने वाहतुकीसाठी सोयीचे आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून हा बाजार जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, आता जून महिना जवळ येत असून उन्हाळी कामे आणि आगामी खरीप हंगामाची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी बैलांची खरेदी-विक्री सुरू केली आहे. तसेच, आगामी महिन्यात पाऊस पडून काही दिवसांत चारा उपलब्ध होणार, असे गृहीत धरून शेतकऱ्यांकडून म्हशी आणि गायींचीही खरेदी वाढली आहे. दरम्यान, बाजारात जिल्ह्यासह पाथर्डी, जालना, परभणी आदी ठिकाणचे व्यापारी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी येतात. दरम्यान, शेतकरी गावरान व जर्शी  बैल शेतीसाठी खरेदी करीत आहेत. विक्रीसाठी येणाऱ्या बैलांच्या प्रजाती गावरान, जर्शी, खिल्लार, मैसूर आदी विविध प्रकारच्या प्रजातींचे बैल बाजारात येत आहेत. मैसूर व खिल्लार प्रजातींचे बैल कारखान्यावर ऊस वाहतुकीसाठी वापरले जातात. गावरान व जर्शी बैलांच्या किमती ४५ हजारांपासून ६५ हजार रुपयांपर्यंत आहेत. तर, मैसूर व खिल्लार बैलजोडींची किंमत एक लाख रुपयांच्या घरात आहे. त्यापेक्षा अधिक किमतीच्या जोड्याही मंगळवारच्या बाजारात दिसून आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT