मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आजही वादळी पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आजही वादळी पावसाचा अंदाज 
मुख्य बातम्या

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आजही वादळी पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील उन्हाच्या ताप दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाच्या झळा कायम असतानाच पूर्व मोसमी पावसाचा तडाखाही सुरूच आहे. आज (ता.२०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जना, विजा, जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज आहे. मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उन्हाचा चटकाही कायम राहण्याची शक्यता आहे. 

सकाळपासूनच वाढलेला उन्हाचा चटका, दुपारच्या उकाड्यानंतर सांयकाळी आकाशात ढगांची दाटी होते. जोरदार वारे, धुळीची लोट उठून, मेघगर्जना विजांसह वळीव स्वरुपाचा पाऊस पडतो. अशीच काहीशी स्थिती राज्याच्या विविध भागात पहायला मिळत आहे. आज (ता.२०) वादळी पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता.२१) अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. 

पूर्व मोसमी पावसाने दणका सुरूच असून, उन्हाचा ताप असह्य होत आहे. रविवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा चटका अधिकच तापदायक ठरत आहे. तर उर्वरीत राज्यातही तापमान चांगलेच वाढले आहे. चैत्र महिना अखेरच्या टप्प्यात आला असून, तापमान आणखी वाढून लवकरच वैशाख वणवा जाणवणार आहे.  रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.८, जळगाव ४१.६, धुळे ४०.४, कोल्हापूर ३७.४, महाबळेश्‍वर ३२.२, मालेगाव ४०.६, नाशिक ३८.८, निफाड ३९.०, सांगली ३७.२, सातारा ३९.१, सोलापूर ४१.०, डहाणू ३३.७, सांताक्रूझ ३४.२, रत्नागिरी ३३.४, औरंगाबाद ४०.३, परभणी ४२.२, अकोला ४३.३, अमरावती ४१.२, बुलडाणा ३९.६, ब्रह्मपुरी ४२.२, चंद्रपूर ४२.५, गोंदिया ४१.८, नागपूर ४१.८, वाशीम ४२.०, वर्धा ४२.०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT