Gram on 8 lakh 65 thousand hectares in Marathwada
Gram on 8 lakh 65 thousand hectares in Marathwada 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात आठ लाख ६५ हजार हेक्‍टरवर हरभरा

टीम अॅग्रोवन

उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभऱ्याला सर्वाधिक पसंती दिली आहे. औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत १ लाख ९९ हजार ४६५ हेक्‍टरवर, तर लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांतील ६ लाख ६५ हजार ६०२ हेक्‍टर अशी ८ लाख ६५ हजार ६७ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. 

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५९ हजार ७१० हेक्‍टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात सर्वसाधारण क्षेत्राच्या १२४ टक्‍के पेरणी झाली आहे. बीड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र ७१ हजार २९० हेक्‍टर असताना प्रत्यक्षात १ लाख २४ हजार १५३ हेक्‍टरवर अर्थात १७४ टक्‍के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली. जालना जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र ४१ हजार ५१८ हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात ४२ हजार १०८ हेक्‍टरवर पेरणी झाली. 

औरंगाबाद  जिल्ह्यात सर्वसाधारण ४५ हजार ९०२ हेक्‍टरच्या तुलनेत ३३ हजार २०४ हेक्‍टरवर, हिंगोली जिल्ह्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ७२ हजार ८५६ हेक्‍टर असताना ८२ हजार ४८८ हेक्‍टरवर, परभणी  जिल्ह्यात सर्वसाधारण ५६ हजार ५६८ हेक्‍टरच्या तुलनेत ६७ हजार ७६० हेक्‍टरवर, नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण ६२ हजार ३५३ हेक्‍टरच्या तुलनेत १ लाख ३० हजार ३०६ हेक्‍टरवर, उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण ८० हजार १३७ हेक्‍टरच्या तुलनेत १ लाख ५२ हजार १५७ हेक्‍टरवर, तर लातूर जिल्ह्यात सर्वसाधारण ९३  हजार ९१२ हेक्‍टरच्या तुलनेत २ लाख ३२ हजार ८९१ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. 

पिकांची उगवण चांगली 

औरंगाबाद, जालना व बीड या तीन  जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेपेक्षा अधिक हरभऱ्याची पेरणी झाली. औरंगाबाद जिल्ह्यात पिकाची उगवण चांगली झाली आहे. पीकवाढीच्या अवस्थेत आहे. बीड जिल्ह्यात उगवण ते फांदी फुटण्याच्या अवस्थेत आहे. परंतु, जास्त पाण्यामुळे पीक पिवळे पडत आहे. काही ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून जालनासह बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत अजूनही हरभरा पेरणी सुरू असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT