केळी
केळी 
मुख्य बातम्या

केळी निर्यातीसाठी शासन उदासीन

टीम अॅग्रोवन

जळगाव ः ॲग्रो एक्‍सपोर्ट झोनमध्ये समाविष्ट असलेल्या जळगाव जिल्ह्यात केळी निर्यातीसंबंधी शासकीय स्तरावरून फारसे प्रयत्न झालेले नाहीत. फक्त घोषणा झाल्या. केळी निर्यातीसाठी जे प्रकल्प हाती घेतले, ते खासगी व्यक्तींना देण्याची वेळही शासकीय यंत्रणेवर आली. खासगी संस्था, खरेदीदार यांच्या पुढाकाराने मागील वर्षी रावेर व चोपडा भागातून फक्त ८०० मेट्रिक टन केळीची निर्यात झाल्याची माहिती आहे.  आठ वर्षांपूर्वी सावदा (ता. रावेर) येथे सुमारे दोन एकर जागेत पणन मंडळाने केळी निर्यातीसंबंधी सावदा उपबाजारअंतर्गत आधुनिक पॅक हाउस उभारले. जवळपास ४० टन क्षमतेचे कूलिंग चेंबर, केळीची स्वच्छता, बॉक्‍स पॅकिंगसाठी युनिट किंवा पॅक हाउस उभारले. जवळपास पाच कोटी खर्च तेथे झाला; पण नंतर खासगी संस्थांना हे पॅक हाउस देण्यात आले. आजघडीलाही खासगी संस्थांना ही यंत्रणा केळीची पॅकिंग, कूलिंग यासाठी दिले आहे. सुरवातीला या पॅक हाउसमध्ये पाण्याची सुविधा अपुरी होती. नंतर पाणी बाहेरून आणून केळीची स्वच्छता केली जायची.  केळी लागवडीत राज्यात जळगाव क्रमांक एक आहे. मागील पाच वर्षे सरासरी ४८ हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. जेवढी लागवड होते, त्यापैकी १० टक्के केळीचीही निर्यात अजून होत नसल्याची स्थिती आहे. केळी लागवडीत रावेर आघाडीवर आहे; परंतु यापाठोपाठ यावल, चोपडा, मुक्ताईनगर, भडगाव-पाचोरा, जळगाव, जामनेरातही बऱ्यापैकी केळी असते. या भागात पॅक हाउस शासकीय यंत्रणांच्या मदतीने साकारले नाहीत.  शेतकऱ्यांच्या पुढाकाराने कार्यवाही शासनाने केळी निर्यातीसंबंधी पॅक हाउस उभारले. यानंतर शासनस्तरावरून पुढे प्रयत्न झाले नाहीत; परंतु हे पॅक हाउस, त्यातील यंत्रणा यासंबंधी अभ्यास करून काही व्यापाऱ्यांनी सावदा येथे पॅक हाउस उभारले. यात आता बॉक्‍समध्ये केळीची पॅकिंग केली जाते. सावदा व फैजपुरात (ता. यावल) मिळून १८ पॅक हाउस आहेत, तर मागील वर्षी तांदलवाडी (ता. रावेर) येथे प्रेमानंद व प्रशांत महाजन यांच्या पुढाकाराने आधुनिक पॅक हाउस उभे राहिले आहे. त्यात केळी साठवणुकीसाठी ८० टन क्षमतेचे कूलिंग चेंबर आहेत.  शहादा येथील केंद्राबाबत घोषणाच शहादा (जि. नंदुरबार) येथे सावदा (ता. रावेर) येथील पॅक हाउसच्या धर्तीवर आधुनिक पॅक पाउस (केळी निर्यात केंद्र) उभारण्याची घोषणा तत्कालीन फलोत्पादनमंत्री विजयकुमार गावीत यांनी केली होती; परंतु या पॅक हाउससंबंधी प्रत्यक्षात कामच झाले नाही. शेतकऱ्यांच्या धडपड्या, उपक्रमशील वृत्तीमुळे ब्राह्मणपुरी येथे केळी पिकवणी व कूलिंग चेंबर साकारले आहे. तसेच काही खरेदीदारांच्या मदतीने केळीची निर्यातही या भागातून होत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT