आले नुकसान
आले नुकसान  
मुख्य बातम्या

बुरशी, जिवाणू, सूत्रकृमीमुळेच आले पिकाचे नुकसान

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद: जिल्ह्यातील आले पिकाचे २०१५-१६ व २०१८-१९ या वर्षात बुरशी, जिवाणू व सूत्रकृमी यांच्यामुळेच मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची बाब प्रयोगशाळेतील तपासणीतून समोर आल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे वनस्पती विकृतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. के. टी. आपेट यांनी दिली.  यासंदर्भात अधिक माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आले पिकाची लागवड केली जाते. पैसे देणारे मसालावर्गीय पीक म्हणून शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड, फूलंब्री व खुल्ताबाद या चार तालुक्‍यांत आले पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. २०१५-१६ व २०१८-१९ या वर्षात औरंगाबाद जिल्ह्यातील आले पिकावर मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादूर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीची संभाव्य कारणे शोधण्यासाठी डॉ. आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज कदम, आशुतोष पाटील, नयन कवठे आदी विद्यार्थ्यांनी कन्नड, सिल्लोड, फूलंब्री व खुल्ताबाद आदी तालुक्‍यांतील बाधीत प्रक्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी व रोगग्रस्त पिकांचे कंद, माती, पाने व खोड आदींचे नमुने घेऊन ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते.  या तपासणीत पिथीअम ॲफॅनीडरमॅटम, फ्युजॅरीअम ऑक्‍झीस्पोरम, स्क्‍लेरोशीयम रॉल्फ्सी या रोगकारक बुरशी तर रायस्टोनिया सोलॅनॅसीरम हा रोगकारक जीवाणू व मेलोडोगाईन सूत्रकृमी हे सर्व घटक कंदमर रोगास कारणीभूत असल्याचे व त्यामुळे नुकसान झाल्याचे समोर आल्याचे प्रा. आपेट यांनी स्पष्ट केले. या रोगकारक बुरशी, जीवाणू व सुत्रकृमी एकत्रितपणे किंवा स्वतंत्रपणेही पिकात रोग निर्माण करतात. त्यामुळे पिकाचे ५० ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होत असल्याचे प्रा. आपेट यांनी नमूद केले.  शास्त्रोक्‍त काळजीपूर्वक पूर्वमशागत, बेणेप्रक्रिया करताना काळजी घेतल्यास होणाऱ्या नुकसानीवर नियंत्रण मिळू शकत असल्याचे प्रा. आपेट यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर शिफारसीनुसार बुरशीनाशके, जीवाणूनाशके यांचा वापर केल्यास रोगांवर प्रतिबंध येण्यास मदत मिळेल असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT