कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्या : डॉ. पवार
कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्या : डॉ. पवार 
मुख्य बातम्या

कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्या : डॉ. पवार

टीम अॅग्रोवन

निल्लोड जि. औरंगाबाद : जमिनीचा पोत व उपलब्ध पाण्याचे सुक्ष्म नियोजन करून पिकाची निवड करावी. कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी नियमितपणे पिकाचे निरीक्षण करून वेळीच उपाययोजना कराव्या, कमी खर्चात जास्त उत्पन्न घेण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विद्यावेत्ता डॉ. सु. ब. पवार यांनी दिला. 

बनकिन्होळा (ता. सिल्लोड) येथे शासनमान्य चारा छावणीच्या ठिकाणी सोमवारी (ता. ३) कृषी विभागातर्फे उन्नती शेती-समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत रोहिणी नक्षत्र पंधरवडा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पवार म्हणाले, ‘‘अधिक उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी पिकांचे नियमित फेरपालट करावे. खरीप हंगामात तीन ते चार इंच  (७५ ते १०० मिलिमीटर) पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकाच वेळी मका लागवड करावी. कपाशीत आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. निंबोळी अर्कसारख्या कीटकनाशकांचा वापरून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या. कमी कालावधीच्या वाणाची निवड केल्यास कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रणात येण शक्‍य आहे. रासायनिक कीटकनाशकांचा अति वापर टाळून एकात्मिक कीड व्यवस्थापनात कामगंध सापळ्यांचा वापर करा.‘‘

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे म्हणाले, ‘‘चारा छावणीच्या ठिकाणी खरीप हंगामपूर्व प्रशिक्षणामुळे पुढील काळात चारा व पाण्याच्या नियोजनासाठी पशुपालक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.‘‘ दीपक गवळी, रमेश गुंडिले, एकनाथ मुंढे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT