संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यातील चार लाख पशुधनावर चाराटंचाईचे सावट

टीम अॅग्रोवन

सातारा  : दुष्काळाची झळ शेतीसह जनावरांना सोसावी लागत आहे. अपुऱ्या पावसामुळे चारा उत्पादन होऊन न शकल्याने माण, खटाव तालुक्यांतील चार लाखांवर पशुधनावर चाराटंचाईचे सावट आहे. माण, खटाव तालुक्यांत अनुक्रमे महिना, दोन महिने पुरेल इतकाच चारा सध्या उपलब्ध आहे. या संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन हजार २३१ हेक्टरवर चारा लागवडीचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. दुष्काळी तालुक्यात स्थंलातरे वाढू लागली आहे. पाणीटंचाईबरोबर आता चाराटंचाईचेही सावट आहे. माण, खटाव तालुक्यांसह कोरेगाव, फलटण, कऱ्हाड, खंडाळा तालुक्यातील काही भागांत तीव्र चाराटंचाईची चिन्हे आहेत. जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ९४१ लहान जनावरे, ५ लाख ९६ हजार १६५ मोठी जनावरे, ३ लाख ९ हजार ०११ शेळ्या तर २ लाख ६४ हजार २२१ मेंढ्या अशी एकूण १३ लाख ०३ हजार ३३८ जनावरे आहेत.

या जनावरांसाठी प्रतिदिन १०,८०६ ओला व ४,३२२ मेट्रीक टन सुका चारा लागतो. यामध्ये माण तालुक्यात ८९ हजार १८३ लहान व मोठी, तर १ लाख ७३ हजार १५१ शेळ्या, मेंढ्या असून, त्यांना प्रतिदिन १४७० मेट्रीक टन चारा लागत आहे. खटाव तालुक्यात ७९ हजार १६८ लहान व मोठी, तर ४७ हजार ८३३ शेळ्या, मेंढ्या असून, त्यांना प्रतिदिन ११४० मेट्रीक टन चारा लागत आहे.

दुष्काळामुळे निर्माण होणाऱ्या चाराटंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील आठ हजार ४६० शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ७० किलो मका बियाणे दिले जाणार आहे. त्यासाठी दोन हजार २३१ हेक्टर क्षेत्रावरुन एक लाख ३७ हजार ३०५ मेट्रीक टन चारा उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी माणमध्ये ४५ हजार ५०९, तर खटावमध्ये १२ हजार १२० मेट्रीक टन चारा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) संजय पाटील यांनी दिली.   किती पुरेल चारा कृषी विभागाच्या नोव्हेंबरमधील आढाव्यानुसार तालुकानिहाय किती महिने ओला चारा पुरेल याचा अंदाज असा (कंसात सुका चारा) : माण २ (६), खटाव ३ (११), फलटण ८ (७), कोरेगाव ८ (६), खंडाळा ४ (९), वाई ६ (६). सातारा ९ (११), कराड ६ (८), पाटण ८ (१३), जावळी ६ (१३), महाबळेश्‍वर ५ (६). वास्तविकता हा चारा तालुक्यांच्या चारा उत्पादनाच्या सरासरीनुसार गृहीत धरला असल्याने चारा उपलब्धतेचे दिवस जास्त दिसत आहे. मात्र, जेथे पाणी पुरेसे आहे, अशा भागात हा चार उपलब्ध असून जेथे पर्जन्यमान कमी झाले आहे, तेथे चारासंकट लवकर येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT