संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार रुपयांवर

टीम अॅग्रोवन

सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे. गेल्या महिन्यात कडबा चाऱ्याचा दर ४ हजार रुपये शेकडा होता आता तोच दर साडेचार हजार रुपयांवर पोचला आहे. गेल्या चार वर्षांतील उच्चांकी दर चाऱ्याला आहे. सध्या हा चारा कर्नाटक भागातून उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात चारा उपलब्ध होत नसल्याने जनावरे सोडून देण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. पाणी आणि चाराटंचाई अशा दुहेरी संकटात पशुपालक सापडले असल्याने पशुधन धोक्यात आले आहे.

खिलार जनावरांसाठी आटपाडी आणि जत तालुके प्रसिद्ध आहे. त्यातच माडग्याळ जातीच्या मेंढीसाठी जत तालुका प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर आणि तासगाव तालुक्यांत यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. याचा परिणाम खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांवर झाला आहे. या दुष्काळी भागातील शेतकरी चाऱ्यासाठी मका, ज्वारीची पिके प्रामुख्याने घेतात. पण पाण्याअभावी या पिकांची वाढच झालेली नाही. 

२०१३ मध्ये जिल्ह्यातील अनेक भागांत छावण्या सुरू होत्या. त्यामुळे चारा उपलब्ध झाला होता. जनावरे जगली होती. परंतु, गेल्यावर्षी जत येथील माडग्याळमध्ये छावणी सुरू झाली होती. परंतु त्याठिकाणी दर्जेदार चारा उपलब्ध न झाल्याने अनेक जनावरे दगावली होती. सध्या चाराच उपलब्ध नसल्याने अद्यापही चारा डेपो अथवा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. सध्या चाऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. कडब्याच्या पेंडीचा दर ४२ ते ४५ रुपये इतका आहे. या दराने कडबा घेऊन जनावरे जगविणे पशुपालकांना अशक्य झाले आहे. त्यातच साखर कारखानेदेखील बंद होऊ लागले आहे. त्यामुळे उसाच्या वाड्याचा चारादेखील मिळत नाही.    

जनावरांची संख्या घटण्याची शक्यता चाराटंचाई निर्माण झाल्यामुळे जनावरांची विक्री वाढली तर खरेदीदारांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे जातिवंत जनावरांच्या किमतींवर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाकड जनावरांना बाजाराचा रस्ता दाखविण्यास सुरवात केली आहे. दुष्काळामुळे जनावरांची संख्या कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.    

चार वर्षांतील कडब्याचे दर (रुपये)  

वर्ष  पेंडीचे दर
२०१५ १२ ते १४ 
२०१६ १० ते १२ 
२०१७ १० ते १२
२०१८ १० ते १५
२०१९ ४२ ते ४५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT