पावसाच्या उघडिपीनंतर तापमानात ‘चढ-उतार’
पावसाच्या उघडिपीनंतर तापमानात ‘चढ-उतार’ 
मुख्य बातम्या

पावसाच्या उघडिपीनंतर तापमानात ‘चढ-उतार’

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानात चढ-उतार होत आहेत. दोन दिवसांपूर्वी तिशीपार गेलेले तापमान पुन्हा खाली घसरले आहे. दिवसाबरोबरच रात्रीच्या तापमानातही घट झाल्याने अनेक ठिकाणी गारठा जाणवू लागला आहे. पुढील आठवडाभर राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.  शनिवारी (ता. ८) राज्याच्या बहुतांशी भागात तापमानाचा पारा सरासरीच्या खाली उतरला आहे. विदर्भात असलेल्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे दिवसाच्या तापमानात ४ ते ७ अंशांची मोठी घट झाली आहे. तर विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही दिवस रात्रीचे तापमान कमी झाले अाहे. सकाळपर्यंत २४ तासांमध्ये बीड येथे दिवसाचे उच्चांकी ३१.८ अंश सेल्सिअस, उस्मानाबाद येथे रात्रीचे नीचांकी १३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.   मध्य प्रदेशाच्या वायव्य भागात असलेल्या ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. यातच माॅन्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. शनिवारी सकाळपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. उर्वरित राज्यात कोरडे व अंशत: ढगाळ हवामान होते. आठवडाभर हिच स्थिती कायम असून, पावसाची उघडीप कायम राहणार आहे. तर तापमानातही चढ-उतार होण्याची शक्यता अाहे.    शनिवार (ता. ८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कसांत किमान तापमान(अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २६.५ (२०.०), जळगाव ३१.० (२१.८), कोल्हापूर २६.३(२०.६), महाबळेश्‍वर १८.८(१५.६), मालेगाव ३०.६(२०.४), नाशिक २८.३(१९.९), सांगली २८.७(१९.४), सातारा २७.६(२०.२), सोलापूर २९.९ (२०.०), सांताक्रुझ ३०.९(२४.२), अलिबाग ३०.२(२४.८), रत्नागिरी २९.३(२३.१), डहाणू ३१.६(२४.५), आैरंगाबाद ३०.०(१८.६), परभणी ३०.१(१९.६), नांदेड ३१.०(१७.२), उस्मानाबाद २८.० (१३.८), अकोला २८.४(२२.५), अमरावती २३.६(२०.८), बुलडाणा २६.५ (२०.२), चंद्रपूर २६.२ (२२.०), गोंदिया २६.२(२३.४), नागपूर २५.८(२२.३), वर्धा २४.२(२०.८), यवतमाळ २५.०(२०.०).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT