weather
weather  
मुख्य बातम्या

विदर्भात पावसाला पोषक हवामान

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. शुक्रवारी (ता.२१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. विदर्भामध्ये पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता.२३) विदर्भात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येत नसल्याने राज्यातील थंडी पूर्णपणे नाहीशी झाली आहे. यातच तापमान पस्तीशीपार गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. धुळे, जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, परभणी, नांदेड, अकोला येथे तापमान ३५ अंशाच्या पुढे आहे. तर बहुतांशी ठिकाणी ३३ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. किमान तापमानातही चांगलीच वाढ झाली असून, शुक्रवारी निफाड येथे नीचांकी १२.४ अंश तापमान नोंदले गेले. मराठवाड्यापासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढग जमा झाले होते. उद्यापासून (ता.२३) विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरीत राज्यात अंशत: ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.   बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.५ (१६.४), नगर ३६.६, धुळे ३५.० (१४.०) जळगाव ३५.० (१६.६), कोल्हापूर ३४.१ (२०.५), महाबळेश्‍वर २९.३ (१७.६), मालेगाव ३५.२ (१८.२), नाशिक ३३.२ (१५.२), निफाड ३०.१ (१२.४), सांगली ३५.५ (२०.०), सातारा ३४.१ (१८.५), सोलापूर ३५.३ (२०.५), अलिबाग ३०.६ (१९.९), डहाणू २९.८ (१९.४), सांताक्रूझ ३४.१(२०.६), रत्नागिरी ३४.० (२०.५), औरंगाबाद ३३.३ (१७.८), परभणी ३५.८ (१९.४), नांदेड ३५.० (१५.०), अकोला ३५.७ (२०.२), अमरावती ३४.० (२०.०), बुलडाणा ३३.२ (१९.४), चंद्रपूर ३३.० (१८.२), गोंदिया ३०.५ (१३.०), नागपूर ३२.५ (१८.२), वर्धा ३३.० (१९.१), यवतमाळ ३४.५ (१९.४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT