Farmers struggling due to falling prices of summer onions
Farmers struggling due to falling prices of summer onions 
मुख्य बातम्या

उन्हाळी कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांची कोंडी

टीम अॅग्रोवन

नाशिक : साठवलेल्या उन्हाळी कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असून साठा सांगतेकडे आहे. शेतकऱ्यांनी संपूर्ण हंगामात दराचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने विक्रीचे नियोजन केले. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नसलेला उठाव, निर्यात प्रक्रियेत धरसोडीच्या धोरणामुळे अस्थिर निर्यात प्रक्रिया त्यामुळे दरामुळे अपेक्षित उत्पन्न हाती आले नाही. आता वातावरणीय बदलांमुळे सड होऊन वजनात घट आली आहे. त्यातच लाल कांद्याची आवक दबावात असताना उन्हाळी कांद्याची आवक कमी असल्याने दरवाढीची अपेक्षा होती. मात्र असे असताना नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत अखेरीस क्विंटलमागे ७०० ते १००० हजार रुपये घसरण झाल्याने दराने शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. 

एप्रिलमध्ये नवी उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर विक्रमी आवक झाली. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मे महिन्यात जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून बाजार समित्या जवळपास दोन आठवडे बंद राहिल्याने कामकाज अडचणीत सापडले. मे महिन्यानंतर ते सुरळीत झाले. जुलै ते सप्टेंबरपर्यंत दरात चढ-उतार होते. तुलनेत ऑक्टोबरमध्ये मागणी वाढून दरात सुधारणा दिसून आली. दिवाळीनंतर बाजारात उठाव होऊन बाजार पुन्हा वधारले. मात्र आवकेत पुन्हा काही अंशी वाढ झाल्याने व मागणी पुन्हा मंदावल्याने दरात घसरण झाली. आता आवक कमी होऊनही दरात फटका बसला आहे. 

चालू वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा रोखून विक्री नियोजन केले. त्यानुसार आवक चांगली होत गेली. मागील वर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये पिंपळगाव बाजारात २ लाख १३ हजार क्विंटल आवक होऊन नोव्हेंबर महिन्यात सरासरी ३,७५५ दर मिळाला होता. तर चालू वर्षी २ लाख ३१ हजार क्विंटल आवक होऊन २,१८५ रुपयांचा सरासरी दर मिळाला. मंगळवारी (ता. ३०) हे दर १,५२१ रुपयांपर्यंत तर अनेक बाजार समित्यांमध्ये महिनाअखेर हे दर १२०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे मर्यादित आवक होत असताना उत्पादन, साठवणूक असा खर्चही वसूल होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

उन्हाळी कांद्याच्या सरासरी दराची स्थिती 
बाजार समिती जुलै ऑगस्ट  सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 
पिंपळगाव बसवंत १,६८५ १,५८१ १,६८० ३,२०१ २१८५ 
लासलगाव १,६९९ १,६८५ १,९०१ ३,०५१ २,०४७ 
उमराणे १,६५० १,७०० १,५०० ३,००० १,८५० 
नामपूर १,७०० १,५०० १,४५० ३,१०० १,८०० 
चांदवड १,६४० १,५८० १,६५० २,९४० २,१३५ 
येवला १,५६५ १,५०० १,६५० २,७०० १,५०० 
सिन्नर १,६४३ १,५८८ १,६४६ २,८५९ २,००५ 
सटाणा १,६७५ १,४०० २,३५० २,४०० १,३७५ 
कळवण १,७०० १,६०० १,५०० ३,५०० १,८०० 

उन्हाळी कांद्याच्या दरात मागणीनुसार चढ-उतार आहे. त्यात सध्या प्रतवारीवर परिणाम असल्याने दर त्यानुसार निघत आहेत.  - मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, ता. निफाड 

देशावर मागणी कमी व निर्यात प्रक्रियेत धरसोडीच्या निर्णयामुळे अपेक्षित उठाव शकला नाही. त्यामुळे साठवणूक करून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. उन्हाळी अंतिम टप्प्यात असताना त्यात लाल कांद्याची अपेक्षित आवक नसताना शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळू शकलेले नाहीत.  - पंडित वाघ, कांदा उत्पादक, बार्डे, ता. कळवण  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT