हमीभाव खरेदीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ
हमीभाव खरेदीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ 
मुख्य बातम्या

हमीभाव खरेदीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

टीम अॅग्रोवन

नाशिक : केंद्र सरकारने यंदाही शेतकऱ्यांचे उडीद, मूग व सोयाबीन ही पिके हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यात नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणीकडे पाठ फिरविल्याने मार्केट फेडरेशनने पुन्हा मुदतवाढ दिली. आॅनलाइन नोंदणीनंतरच प्रत्यक्ष खरेदीला सुरवात केली जाणार आहे.

दरवर्षी उत्पादित केलेल्या मालाची बाजारात आवक वाढली की, व्यापाऱ्यांकडून मालाचा भाव पाडून खरेदी केली जाते. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. खुल्या बाजारात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल खरेदी केला जातो. त्यासाठी या मालाला आधारभूत किंमत निश्चित केली जाते. गेल्या वर्षीही जिल्ह्णात अशाचप्रकारे उडीद, मूग, सोयाबीन, मका, तूर या पिकांना हमीभाव देऊन शासनाने खरेदी केली. यंदाही आॅनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्याच्या सूचना मार्केट फेडरेशनला देण्यात आल्या आहेत. यात प्रारंभी शेतकऱ्यांसाठी आॅनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांचे आधार क्रमांक, बॅँक खाते क्रमांक, सातबारा उताऱ्यावरील पिकाची नोंद, एकूण हेक्टर आदी बाबींची नोंदणी करावी लागते. त्यासाठी मार्केट फेडरेशनने जाहिरात देऊन बाजार समित्या, खरेदी-विक्री संघांना आवाहन केले होते. मात्र येवला खरेदी-विक्री संघानेच त्यासाठी तयारी दर्शविली.

यंदा शासनाने गतवर्षाच्या तुलनेत हमीभावात वाढ केली. उडदासाठी ५७०० रुपये क्विंटल दर देण्यात आला आहे. गेल्या वर्षी तो ५६०० इतका होता. मुगासाठी ७०५० रुपये दर निश्चित केला आहे. गतवर्षी तो ६९७५ इतका दर होता. सोयाबीनसाठी ३७१० रुपये दर देण्यात आला आहे. गेल्या वर्षापेक्षा तीनशे रुपयांनी हा दर अधिक आहे. 

जिल्ह्यात केवळ एक केंद्र  

जिल्ह्यात एकच केंद्र सुरू असून येवला केंद्रावर केवळ २० ते २५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शासनाने १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाइन नोंदणी करण्याची मुदत दिली होती. मात्र याकाळात बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली. नोंदणीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याचे पाहून पणन महामंडळाने पुन्हा एक आणखी मुदतवाढ दिली. त्यात आता उडीद, सोयाबीनसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुगाची नोंदणी ३१ आॅक्टोबरपर्यंत करता येईल. त्यानंतरच साधारणत: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात फेडरेशनकडून खरेदी सुरू होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT