अडत्याने शेतकऱ्याला कमिशन कापून दिलेली कच्ची पावती.
अडत्याने शेतकऱ्याला कमिशन कापून दिलेली कच्ची पावती. 
मुख्य बातम्या

भडगावला अडतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरूच

टीम अॅग्रोवन

जळगाव ः बाजार समितीत अडत वसुली बंदचा निर्णय होऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला. तरीही भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट यार्डात शेतकऱ्यांकडून सर्रास अडत वसुली केली जात आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडे तक्रार करूनही अडतदार जुमानत नसल्याचेही समोर आले असून, शेतकऱ्यांची लाखो रुपयांची लूट यातून झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.  भडगाव बाजार समितीचे भाजीपाला लिलाव शहरात नगर परिषदेनजीक पहाटेपासून सुरू होतात. रोज सुमारे ३५ गावांमधील शेतकरी वांगी, मिरची, भेंडी, कोथिंबीर व इतर भाजीपाला आणतात. या बाजार समितीच्या कजगाव, नगरदेवळा येथील उपबाजारांमध्येही कमिशनखोरीचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांकडून मिरची व इतर भाजीपाल्याच्या विक्रीपोटी १०० रुपयाला १२ रुपये कमिशन घेतले जाते. त्यापोटी शेतकऱ्याला कच्ची पावती दिली जाते. रोज हा प्रकार सुरू असून, या प्रकारातून वर्षभरात लाखो रुपयांची लूट बाजार समितीमध्ये झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.  कोठली (ता. भडगाव, जि. जळगाव) येथील शेतकरी बबन रामकृष्ण पाटील यांनी शुक्रवारी (ता.८) सुमारे ८३ किलो मिरची एका अडतदारातर्फे विकली. किलोमागे २१ रुपये दर मिळाला. अडतशिवाय शेतकऱ्याला १७४३ रुपये मिळणे अपेक्षित होते, परंतु त्याला या रकमेतून संबंधित अडतदाराने १८४ रुपये अडत कापून १५६९ रुपये दिले. त्यासंबंधीची कच्ची पावती त्याच्या हातात टेकवली. 

जागेवरच परवाना रद्द करील... भडगाव बाजार समितीत भाजीपाला उत्पादक किंवा इतर शेतकऱ्यांकडून अडत वसुली, कमिशनखोरी सुरू असेल तर दोषी व्यापारी किंवा अडतदाराचा परवाना जागेवरच रद्द केला जाईल. मला फक्त यासंबंधीची कच्ची पावती समक्ष भेटून येत्या सोमवारी (ता.११) प्राप्त व्हायला हवी. याबाबत तातडीने संबंधितांशी संपर्क साधला जाईल, असे जळगाव जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर ‘ॲग्रोवन’ला सांगितले. 

प्रतिक्रिया मी जवळपास ८३ किलो मिरची बाजार समितीत शुक्रवारी (ता. ८) विकली. तिच्या विक्रीपोटी माझ्याकडून शेकडा १२ रुपये कमिशन अडतदार यांनी घेतले. शेतकऱ्यांनी मध्यंतरी तक्रार केली होती, परंतु  दखल घेतली नाही.  - बबन रामकृष्ण पाटील, मिरची उत्पादक, कोठली, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT