शेतकऱ्यांनी दिला माती अन्‌  पाण्याविषयी जागरूकतेचा परिचय
शेतकऱ्यांनी दिला माती अन्‌ पाण्याविषयी जागरूकतेचा परिचय 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांनी दिला माती अन्‌ पाण्याविषयी जागरूकतेचा परिचय

Santosh Munde

माती अन्‌ पाण्याशिवाय शेतीची कल्पना शक्‍य नाही. शिवाय तंत्रज्ञानाच्या विकासामुळे माती अन्‌ पाण्याच्या परीक्षणातून पीकपद्धतीची रचना करण्याचं शास्त्र पुढे आलयं. त्याच महत्त्व शेतकऱ्यांना पटत असल्याचं ‘ॲग्रोवन''च्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने पुढे आलं. त्याला निमित्त ठरली ती एमआयटीची कृषी अभियांत्रिकी संलग्नित माती-पाणी परीक्षणाची फिरती प्रयोगशाळा. 

औरंगाबाद शहरातील जबींदा मैदानावर ‘ॲग्रोवन''चे कृषी प्रदर्शन २७ ते ३० डिसेंबर दरम्यान पार पडले. या प्रदर्शनात संपूर्ण राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या कृषी ज्ञानाची भूक भागविली. या कृषी ज्ञान सोहळ्याच्यानिमित्ताने औरंगाबादच्या एमआयटी सेंटर फॉर ॲनालिटिकल रिसर्च अँड स्टडीज औरंगाबादच्या वतीने माती व पाणी परीक्षणाची फिरती प्रयोगशाळा प्रदर्शनस्थळी ठेवण्यात आली. त्यामध्ये राज्यातील चोवीस जिल्ह्यांतील २१७५ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष माती व पाणी परीक्षणासाठी नोंद केली. यामध्ये औरंगाबाद, परभणी, जालना, बुलडाणा, बीड, नांदेड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. 

काही गावांच्या ग्रामपंचायत सदस्यांनी, पदाधिकाऱ्यांनी गावातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या जमिनीची व पाण्याची तपासणी करण्यासाठी एमआयटीच्या माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेला आपल्या गावात येण्याचे निमंत्रण दिले, अशी माहिती प्रयोगशाळेच्या वतीने देण्यात आली. जमिनीचे प्रकार, त्यामधील घटक, माती परीक्षणाचा उपयोग, माती परीक्षण का करावे, मातीचा नमुना केव्हा घ्यावा, कोठे घ्यावा, कसा घ्यावा, पाणी तपासणी का करावी, पाण्याचा नमुना कसा घ्यावा, पाण्याचा व मातीचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी आदींविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. त्यामुळे शेतकरी आता माती व पाण्याविषयी मोठ्या प्रमाणात सजग होत असल्याचे निदर्शनास आल्याचे अमोल निकम म्हणाले. 

अशा होत्या सुविधा  प्रयोगशाळेत व स्टॉलवर माहितीपत्रक, मातीचा पाण्याचा नमुना कसा घ्यायचा, जमीन व पाणी तपासणीचे नेमके प्रकार किती, सामू आणि क्षारता तपासणीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखविले. त्यामुळे शेतकऱ्यांना माती व पाणी परीक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात यश मिळाले. यामध्ये एमआयटीच्या मातीपरीक्षण तज्‍ज्ञ डॉ. नंदिनी जोशी, मंगेश मुंडे, पूजा सोळंके, अश्‍विनी हनुमंते आदींनी महत्त्वाची भूमिका बजाविली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT