बिकानेर, राजस्थान ः शेतकऱ्यांच्या अांदोलनाला पाठिंबा देत येथील विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला.
बिकानेर, राजस्थान ः शेतकऱ्यांच्या अांदोलनाला पाठिंबा देत येथील विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. 
मुख्य बातम्या

कर्जमाफीसाठी राजस्थानमध्ये शेतकऱ्यांचे अांदोलन सुरूच

वृत्तसेवा

सिकर, राजस्थान ः कर्जमाफी, पीक नुकसानभरपाई, पीकविम्याची रक्कम मिळावी, स्वामिनाथन अायोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी यांसह एकूण ११ मागण्यांसाठी राजस्थानमधील शेतकऱ्यांचे गेल्या तेरा  दिवसांपासून अांदोलन सुरू अाहे.

मुख्यतः राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अांदोलन अधिक उग्र बनले अाहे. सिकर जिल्ह्यातून सुरू झालेले शेतकरी अांदोलन अाता राज्यातील अन्य जिल्ह्यांतही पसरले अाहे. शेतकरी अांदोलनामुळे सिकर येथे दूध, भाजीपाला पुरवठा ठप्प झाला अाहे. त्यामुळे दर भडकले अाहेत. या अांदोलनामुळे बाजारातील चाळीस ते पन्नास कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले असल्याचे सांगण्यात अाले अाहे.  

बुधवारी (ता. १३) देखील या ठिकाणी अांदोलन करण्यात अाले. शेतकऱ्यांनी चक्काजाम अांदोलन केल्याने सिकर जिल्ह्याची नाकाबंदी झाली होती. हजारो शेतकरी सिकर-जयपूर मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर ठिय्या मारून बसले अाहेत. दरम्यान, शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला सरकारने दुसऱ्यांदा चर्चेसाठी बोलाविले अाहे. या चर्चेनंतर अांदोलनाची पुढील दिशा ठरणार अाहे.

गेल्या रविवारी (ता. १०) सिकर जिल्हा पालकमंत्र्यांशी शेतकरी शिष्टमंडळाने चर्चा केली होती. मात्र ही चर्चा अयशस्वी ठरली. त्यानंतर शेतकऱ्यांनी चक्काजाम अांदोलन करण्यास सुरवात केली अाहे. ‘‘कर्जमाफी तसेच स्वामिनाथन अायोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी सरकार करत नसेल तर चक्काजाम अांदोलन सुरूच राहील,’’ असा इशारा अांदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे नेते अाणि माजी अामदार अामराराम यांनी दिला अाहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

  •  शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा
  •  पीक नुकसानाची भरपाई मिळावी
  •  पीकविम्याची रक्कम तत्काळ द्यावी
  •  स्वामिनाथन अायोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT