वाघाच्या दहशतीखालील कारंजा घाडगे तालुक्‍यातील गावे  टाकणार निवडणुकीवर बहिष्कार
वाघाच्या दहशतीखालील कारंजा घाडगे तालुक्‍यातील गावे टाकणार निवडणुकीवर बहिष्कार 
मुख्य बातम्या

वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार निवडणुकीवर बहिष्कार

टीम अॅग्रोवन

वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून वाघाची दहशत आहे. या वाघाचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरल्याने याचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.  कारंजा घाडगे तालुक्‍यातील बोरगाव (गोंडी), ससून्द, मेठहिरजी, गरमसुर, धानोली परिसरात गेल्या महिनाभरापासून वाघाने दहशत निर्माण केली आहे. या कालावधीत तब्बल ५० जनावरांचा फडशा या वाघाकडून पाडण्यात आला. गोठ्यातील जनावरे देखील सुरक्षीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यातच आगरगाव येथील युवा शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यामुळे गावकऱ्यांच्या संतापात भर पडली. वनविभागाकडून या वाघांचा शोध घेण्यासाठी जंगल परिसरातील भागात दहा ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. गावकऱ्यांचा रोष वाढता असल्याने वनविभागाकडून दरदिवशी शोध मोहीम देखील राबविली जात आहे. हे सारे प्रयत्न करूनही वाघाचा मागमूस लागला नाही. दुसरीकडे वाघाकडून जनावरांचा फडशा पाडण्याचे सत्र सुरू आहे. दरम्यान वनविभागाने हा वाघ नसून पिंकी नामक वाघीण असल्याचा खुलासा केला आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात ती परतल्याचेही वनविभाग सांगत आहे.  गावकऱ्यांनी लावले बहिष्काराचे फलक जनावरे आणि नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी किंवा ठार मारणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. त्याचा विरोध म्हणून निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला आहे. काही गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ काळे झेंडे गावात लावले आहेत. बोरगाव गोंडी गावात ठिकठिकाणी बहिष्काराचे फलक झळकले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT