बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर  वसुलीबाबत समिती स्थापन करणार  At the entrance of the market committee cess A committee will be set up for recovery
बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर  वसुलीबाबत समिती स्थापन करणार  At the entrance of the market committee cess A committee will be set up for recovery 
मुख्य बातम्या

पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर वसुलीबाबत समिती स्थापन करणार 

टीम अॅग्रोवन

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह राज्यातील विविध बाजार समित्यांमधील सेसची (बाजार शुल्क) वसुली खरेदीदारांकडून रोज प्रवेशद्वारावरच वसूल करण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्यात येईल. समितीच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.  पुणे बाजार समितीमधील आडते असोसिएशन आणि पूना मर्चटस चेंबर ने सेस प्रवेशद्वारावर वसूल करण्याची मागणी केली होती. या मागणी बाबत मंत्री पाटील यांनी तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्‍चात तंत्रज्ञान संस्थेत बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, पणन सहसंचालक विनायक कोकरे, मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे, सचिव संदीप देशमुख, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, मर्चटस चेंबरचे वालचंद संचेती आदी उपस्थित होते.  या बाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले, ‘‘बाजार समितीमधील खरेदीदारांकडून प्रवेशद्वारावर सेसच्या वसुलीची मागणी विविध व्यापारी असोसिएशन कडून मागणी करण्यात आली आहे. गेटवर सेस वसुलीबाबत अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापन करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. शेतकरी व ग्राहकांचे हीत लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व टिकले पाहिजे. समितीच्या कामकाजात गैरव्यवहार आणि कामगारांची व शेतकऱ्यांची पिळवणूक होता कामा नये. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिक्रमण होणार नाही या बाबत दक्षता घेण्यात यावी.‘‘ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT