Dr. Vinay Kore
Dr. Vinay Kore 
मुख्य बातम्या

वारणा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

टीम अॅग्रोवन

वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. २१ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अमित माळी यांनी जाहीर केले. नूतन संचालक मंडळात नवीन आठ चेहऱ्यांना संधी देण्यात आली.  निवडणुकीसाठीच्या छाननी प्रक्रियेनंतर २१ जागांसाठी ३६ उमेदवारी अर्ज पात्र ठरले होते. त्यामधील १५ जणांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे २१ जागांसाठी २१ उमेदवार राहिल्याने सन २०२२-२७ या वर्षासाठीची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अमित माळी यांनी जाहीर केले.  ‘‘साखर उद्योगातील अडचणीच्या काळात वारणा परिसरातील ८० खेड्यांतील शेतकरी सभासदांनी आमच्यावर जो विश्‍वास टाकला त्यास पात्र राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,’’ असे सांगून ‘वारणा’चे प्रमुख माजी मंत्री विनय कोरे यांनी शेतकरी सभासदांचा, कार्यकर्त्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. 

बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ असे - 

विनय कोरे (वारणानगर), सुभाष पाटील (कोडोली), सुभाष कणसे (सातवे), शहाजी पाटील (जुने पारगाव), उदयसिंह पाटील (चावरे), प्रदीप तोडकर (अंबप), सुभाष पाटील (नागाव), सुभाष जाधव (घुणकी), रावसाहेब पाटील (भादोले), प्रतापराव पाटील (शिगाव), संदीप जाधव (येलूर), डॉ प्रताप पाटील (ऐतवडे खुर्द), श्रीनिवास डोईजड (चिकुर्डे), विजय पाटील (मांगले), श्यामराव पाटील (सागाव), किशोर पाटील (कणेगाव), विजय धनवडे (किणी), रवींद्र जाधव (बहिरेवाडी), काकासो चव्हाण (भेंडवडे), वैशाली पाटील (कोडोली), रंजना पाटील (कांदे). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT