नगर जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडीने लढवावी Election of Nagar District Bank Mahavikas should fight with the front
नगर जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडीने लढवावी Election of Nagar District Bank Mahavikas should fight with the front 
मुख्य बातम्या

नगर जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडीने लढवावी

टीम अॅग्रोवन

नगर :  नगर जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने एकत्र लढावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  केली आहे. रविवारी (ता. २४) काही कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. त्या बाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी बुधवारी (ता. २७) मुंबईत प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.   नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या राजकारणात लोणीचे विखे पाटील, संगमनेरचे थोरात, कोपरगावचे काळे पाटील, पाथर्डीचे राजळे, नेवाशाचे गडाख, शेवगावचे विखे, श्रीगोंद्याचे जगताप व नागवडे, नगरचे कर्डिले, जगताप या कुटुंबाचा सक्रिय सहभाग राहिला आहे. या वेळी विखे पाटील भाजपमध्ये आहेत. भाजपने स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे या वेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूकही महाविकास आघाडीने एकत्र लढवण्याचा तयारी केली आहे, तशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा थोरात विरुद्ध विखे असा सामना नगर जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे.  महाविकास आघाडीची रणनीती ठरवण्यासाठी बुधवारी मुंबईत बैठक होत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ मार्गदर्शन करतील. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी बैठकीस यावे, असे आवाहन पवार यांनी केले. नगर येथे कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेवेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नरेंद्र घुले, राहुल जगताप, पांडुरंग अभंग आदी उपस्थित होते. चंद्रशेखर घुले यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Rate : टोमॅटोचे दर उतरलेलेच, मेथीच्या दरात वाढ, पावसाचा भाजीपाला मार्केटवर असा परिणाम

Onion Export : कांदा निर्यात परवानगीवरून राजकारण तापले! शरद पवारांसह राऊत यांची मोदींवर घणाघाती टीका

Soil Nutrient Management : जमिनीमध्ये संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

Rabadi Production Industry : रबडी निर्मितीद्वारे मिळवला दरांचा योग्य मोबदला

Hapoos Mango Prices : हापूस आंब्याच्या दरात घसरण, वादळी पावसाचा परिणाम

SCROLL FOR NEXT