बाजार समित्यांच्या खर्चाचा लागेना ताळमेळ
बाजार समित्यांच्या खर्चाचा लागेना ताळमेळ  
मुख्य बातम्या

बाजार समित्यांच्या खर्चाचा लागेना ताळमेळ

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणुका होऊन आता दीड महिन्याचा कालावधी संपला. परंतु, या निवडणुकीसाठी नेमका किती खर्च झाला, याचा ताळमेळ अद्यापही लागलेला नाही. संबंधित बाजार समित्यांकडून याबाबत सातत्याने विचारणा होत असतानाही निवडणुकीचा खर्च जाहीर झालेला नाही.

सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनांनुसार बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रति मतदार ५० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निवडणुकीपूर्वी   सोलापूर व बार्शी या दोन्ही बाजार समित्यांकडून निवडणूक निधी घेण्यात आला आहे. सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनांनुसार या बाजार समित्यांकडून घेतलेल्या निधीतील निम्मी रक्‍कम त्यांना परत करावी लागणार आहे. परंतु, त्याबाबतची कार्यवाही संथगतीने सुरू असल्याने बाजार समित्यांची मोठी रक्‍कम निवडणूक शाखेकडे अडकून पडल्याचे दिसून येते. मतदार याद्या बनविणे व प्रसिद्ध करणे, मतदार याद्यांच्या  छायांकित प्रती काढणे, मतदान साहित्यांची वाहतूक, नियुक्‍त कर्मचाऱ्यांचा भत्ता, चहा-पाणी, जेवण याचाही खर्च बाजार समितीच्या निवडणूक निधीतून कपात करण्यात येणार आहे.

आकडे बोलतात...

सोलापूर बाजार समिती मतदान केलेले मतदार : ५९,३५० अपेक्षित खर्च : २९,६७,५०० रुपये बाजार समितीने दिलेला निधी : ८६.२० लाख

बार्शी बाजार समिती मतदान केलेले मतदार : ६१,१७२ अपेक्षित खर्च : ३०,५८,६०० रुपये बाजार समितीने दिलेला निधी : ७४.५० लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT