सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान Due to heavy rains in Sindhudurg Damage to rice plants
सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान Due to heavy rains in Sindhudurg Damage to rice plants 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सलग चार पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या काही भागातील भात रोपे पाण्याखाली राहिल्यामुळे कुजली आहेत, तर काही शेतकऱ्यांचे भात बियाणेच वाहून गेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता दुबार भातरोपे तयार करावी लागणार आहेत. जिल्ह्यात १२ जून ते १७ जून या कालावधीत मुसळधार पाऊस झाला. त्यात दोन दिवस अतिवृष्टी झाली. अनेक भागात पूरसदृश स्थिती झाली. बांदा, खारेपाटण आणि दोडामार्ग तालुक्यांतील काही गावांमध्ये पुराचे पाणी बाजारपेठेसह शेतीत शिरले. या भागातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी भात रोपे तयार केली होती. रोपांची वाढ देखील चांगली झाली होती. परंतु पुराचे पाणी सलग दोन दिवस भात रोपांवर साचून राहिले. त्यामुळे ही सर्व रोपे कुजून गेली तर काही शेतकऱ्यांची भात रोपेच वाहून गेली आहेत. रोपांकरिता घातलेले भात बियाणेच वाहून जाण्याचे प्रकार देखील सासोली परिसरात घडले  आहेत.  भात रोपे, भात बियाणे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आता परत भात रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा जमिनीच्या मशागतीपासून सर्व कामे करावे, बियाणे खरेदी करावी लागणार आहे. या शिवाय शेतजमिनीत अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे तेथे भात रोपे तयार करताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे नेमके काय करावे, या चिंतेत शेतकरी आहेत. सध्या पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पुन्हा भात रोपे तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. अतिवृष्टीचा भात रोपांसोबत अनेक भागातील ऊस शेतीला देखील तडाखा बसला आहे. खारेपाटण परिसरातील चिंचवली गावातील ऊस शेतीत पाणी घुसून नुकसान झाले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT