दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कारांची घोषणा
दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कारांची घोषणा 
मुख्य बातम्या

दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कारांची घोषणा

टीम अॅग्रोवन

मुंबई: १२ व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान २०१९ च्या पुरस्कारांची घोषणा कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (ता. ३) मंत्रालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात केली. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी, तज्ज्ञ, संस्था यांचा सन्मान करण्यात येतो. ३ जुलै २०१९ रोजी, सायंकाळी ६ वाजता मुंबई दूरदर्शन येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास आमदार प्रसाद लाड, दूरदर्शनचे अपर महासंचालक एम. एस. थॉमस, उपसंचालक नंदन पवार, सहायक संचालक जयू भाटकर, जावेद शेख आदी या वेळी उपस्थित होते. पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे

  • जल व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य- हणमंतराव जनार्दन मोहिते, मु. पो. यशराज शेती फार्म, मोहित्यांचे वडगांव, ता. कडेगांव, जि. सांगली
  • कृषी क्षेत्रातील संशोधन किंवा अभिनव उपक्रमातील उल्लेखनीय कार्य - डॉ. पी. जी. पाटील, डॉ. एस. के. शुक्ला, डॉ. व्ही. जी. अरुडे, डॉ. व्ही. मगेश्वरण, डॉ. सुंदरमूर्थी, डॉ. पी. एस. देशमुख, डॉ. ए. के. भारीमल्ला, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (सिरकॉट), भारतीय कृषी संशोधन परिषद, मुंबई.
  • ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योगातील उल्लेखनीय कार्य - परांजपे अॅग्रो प्रोडक्टस (इं) प्रायवेट लिमिटेड, G-१/१ मिरजोळे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ क्षेत्र, जि. रत्नागिरी.
  • पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य - पवन ताराचंद कटनकार, मु. सिंदपुरी, पो. सिहोरा, ता. तुमसर, जि. भंडारा.
  • मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य - श्रीमती वच्छलाबाई महादेवराव गर्जे, मु. पो. मादणी, ता. बांभूळगाव, जि. यवतमाळ.
  • फळे, फुलशेती व भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य - यज्ञेश वसंत सावे, रा. ब्राह्मणगाव, झाई बोरीगाव, पो. बोर्डी, ता. तलासरी, जि. पालघर.
  • कृषी व सामाजिक वनीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य - श्रीकांत पाठक (भापोसे), समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट नं - ७, दौंड.
  • कृषिपूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य- (रेशीम, मधमाशापालन, गांडूळशेती, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन, वराहपालन, कृषिपर्यटन आणि इतर संबंधित उद्योग) अशोक दशरथ भाकरे, बी.एससी.बी.एड, मु. पो. धामोरी, ता. कोपरगांव, जि. अहमदनगर.
  • कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य - प्रशांत बबनराव नाईकवाडी, बंगला नं १, श्रमगाथा सोसायटी, एकता चौक, संगमनेर कॉलेजच्या पाठीमागे, संगमनेर, जि. अहमदनगर.
  • कृषी मालाच्या पणन व्यवस्थेसंबंधी उल्लेखनीय कार्य - मधुकरराव राजाराम सरप, मु. पो. कान्हेरी (सरप), ता. बार्शीटाकळी, जि. अकोला.
  • कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी महिला शेतकरी - श्रीमती मेघा विलासराव देशमुख, मु. पो. झरी, ता. जि. परभणी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

    Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

    Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

    Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

    Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

    SCROLL FOR NEXT