द्राक्ष, ॲपल बोरांच्या रेल्वे वाहतुकीला सवलत  द्या Discount grape, apple orchard transport
द्राक्ष, ॲपल बोरांच्या रेल्वे वाहतुकीला सवलत  द्या Discount grape, apple orchard transport 
मुख्य बातम्या

द्राक्ष, ॲपल बोरांच्या रेल्वे वाहतुकीला सवलत  द्या

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘शेतीमाल देशभरातील बाजारपेठेत पोहचविता यावा, यासाठी देशातील पहिली ‘कृषी रेल्वे’ सुरू झाली आहे. या रेल्वेगाडीमुळे नाशिकसह परिसरातील शेतमाल देशभरात पोचविणे सहज शक्य झाले आहे.  मात्र  द्राक्ष, ॲपलबोर तसेच काही भाजीपाल्याला वाहतुकीसाठी दिलेल्या पन्नास टक्के अनुदानातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या शेतीमालाचा पन्नास टक्के अनुदान योजनेते तातडीने समावेश करावा,’ अशी आग्रही मागणी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी  केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली आहे.         केंद्र शासनाच्या वतीने सात ऑगस्टपासून देवळाली रेल्वे स्थानकातून देवळाली-दानापूर या मार्गावर  विशेष कृषी रेल्वे सुरू करण्यात आली आहे. देशात पहिल्यांदा कृषी रेल्वेचा प्रयोग करण्यात आला आहे. रेल्वेकडून शेतीमाल वाहतुकीला विशेष पन्नास टक्के भाड्यात सवलत दिली जाते. मात्र यात द्राक्ष, ॲपल बोर, तसेच काही भाजीपाला आदी पिकांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे जिल्हातील शेतकऱ्यांची आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे द्राक्ष, ॲपलबोर यासह समाविष्ट नसलेल्या अन्य भाजीपाला वाहतुकीला रेल्वेकडून पन्नास टक्के अनुदानाची सवलत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी खासदार गोडसे यांच्याकडे केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर गोडसे यांनी मंत्री तोमर यांची भेट घेतली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. या बाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही कृषीमंत्री तोमर दिल्याची माहिती गोडसे यांना दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT