डाळिंबासाठी क्‍लस्टर डेव्हलप करणार; केंद्रीय कृषी मंत्रालयात बैठक
डाळिंबासाठी क्‍लस्टर डेव्हलप करणार; केंद्रीय कृषी मंत्रालयात बैठक 
मुख्य बातम्या

डाळिंब क्‍लस्टरसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयात बैठक

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने अखिल भारतीय फळबागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरडवाहू शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्रातील डाळिंबाचे वाढते उत्पादन लक्षात घेता डाळिंबाची उत्पादकता आणि गुणवत्ता, या विषयावर अधिक भर राहिला. त्यातून स्वतंत्र क्‍लस्टर डेव्हलप करणे व डाळिंबाच्या रेसिड्यू फ्रीमधील अडचणी लक्षात घेऊन काही बदल करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली.

कोरडवाहू शेतीसाठी किफायतशीर ठरलेल्या डाळिंबाची उत्पादकता, गुणवत्ता आणि निर्यातवृद्धीसाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रायलयाने पुढाकार घेतला असून, नुकतीच नवी दिल्ली येथे कृषी मंत्रालयाने अखिल भारतीय फळबागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यात डाळिंबासह आंबा, केळी, द्राक्षाच्या फळ बागातयदार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या मुद्द्या‌वर झाली चर्चा डाळिंबाचे सध्या भगवा वाण सर्वाधिक वापरले जाते. या वाणाचा रंग चांगला आहे, चवही आहे. पण, अन्य स्पर्धक देशांच्या तुलनेत पुरेसा आकार नाही. त्यामुळे नव्या वाणावर आणखी काम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच, डाळिंबाच्या निर्यातीत रेसिड्यू फ्री डाळिंबासाठी सध्या सात फंगीसाइडस्‌ना निर्यातीत मान्यता आहे. पण, याशिवाय आणखी सुमारे ४० फंगीसाडस्‌ची अडचण आहे. त्यांच्या चाचण्या घेऊन त्यालाही मान्यता मिळावी, अशी मागणी करण्यात आली. तेव्हा या चाचण्या अधिक खर्चिक आहेत, तो खर्च कोणी करायचा हा मुद्दा उपस्थित झाला. पण त्याबाबत संशोधन केंद्र, औषधे तयार करणाऱ्या खासगी कंपन्या यांच्याशी समन्वय ठेवून काय करता येईल, हे पाहू, असे आश्‍वासन कृषी सचिवांनी दिले. याशिवाय प्रक्रिया उद्योग आणि क्‍लस्टर डेव्हलपमेंटवर चर्चा झाली. त्यानुसार काही ठिकाणे त्यासाठी निश्‍चित करण्यात आली आहेत. तसा प्रस्ताव तयार आहे.

कृषी मंत्रालयापुढे आम्ही आमच्या अडचणी मांडल्या आहेत. क्‍लस्टर डेव्लपमेंटच्या दृष्टीने प्राथमिक चर्चा झाली. लवकरच त्यावर काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. पण मुळात नवीन वाणाची निर्मिती, प्रक्रिया उद्योगाला चालना आणि निर्यातीतील अडचणीवर तातडीने काम होण्याची गरज आहे.  -प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT