गाळप परवान्यांची २४ कारखान्यांकडून मागणी
गाळप परवान्यांची २४ कारखान्यांकडून मागणी 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यात २४ कारखान्यांकडून गाळप परवान्यांची मागणी

टीम अॅग्रोवन

सोलापूर : गेल्या वर्षीचा दुष्काळ अन्‌ चाराटंचाईमुळे उसाचा वापर झाला. त्यामुळे जिल्ह्यात आजघडीला ४७ हजार हेक्‍टर ऊस शिल्लक राहिला आहे. मागच्या वर्षी जिल्ह्यात ६८ हजार हेक्‍टर उसाचे क्षेत्र असताना २८ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. पण तो अवघ्या काही दिवसातच संपला. यंदाही जिल्ह्यातील २४ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. परंतु यंदाही उसाचे क्षेत्र ४७ हजार हेक्‍टरपर्यंत आहे. त्यामुळे तो किती कारखान्यांना पुरणार आणि किती कारखाने पूर्ण क्षमतेने चालणार याबाबत साशंकताच आहे. 

सांगली, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे साखर आयुक्‍तालयातील सूत्रांनी सांगितले. सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळात सुमारे २०० चारा छावण्या सुरू झाल्या. आजही जवळपास दीडशेहून अधिक छावण्या सुरूच आहेत. या सर्व छावण्यांची मदार उसावर आहे. त्यामुळे उसाच्या सर्वाधिक वापरामुळे प्रत्यक्ष गाळपाला किती मिळणार, याविषयी शंका आहे. 

आता फक्त ४७ हजार हेक्‍टर ऊस उपलब्ध असल्याचे आकडेवारी सांगते. शिवाय अनेक तालुक्यांत पाण्याअभावी शेतकऱ्यांनी उसाची नांगरट केली. पाण्याअभावी उसाची अपेक्षित वाढही झाली नाही. त्यामुळे एकरी उत्पादकता, गुणवत्ता या सगळ्या गोष्टींबाबत शंका उपस्थित होत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर यंदा जिल्ह्यातील हंगामाकडेही लक्ष लागले आहे. 

या कारखान्यांनी मागितले परवाने

लोकमंगल शुगर, लोकमंगल ॲग्रो, चंद्रभागा, लोकनेते, विठ्ठलराव शिंदे, पांडुरंग, सहकार महर्षी, भैरवनाथ शुगर (३), श्री सिद्धेश्‍वर, जकराया, युटोपियन, विठ्ठल रिफायनरी, फॅबटेक, दि सासवड माळी, गोकूळ शुगर, जयहिंद, संत दामाजी, गोकूळ माउली, मातोश्री, कुर्मदास आणि विठ्ठल अशा २४ कारखान्यांनी गाळपाच्या परवानगीसाठी साखर आयुक्‍तांकडे ऑनलाइन अर्ज केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT