चक्रीवादळ, पावसाने भातशेतीचे झालेले नुकसान
चक्रीवादळ, पावसाने भातशेतीचे झालेले नुकसान 
मुख्य बातम्या

चक्रीवादळाचा सिंधुदुर्गला तडाखा

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग  ः ‘क्यार’ चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग किनारपट्टीलगतच्या मालवण, वेंगुर्ला भागाला जोरदार तडाखा बसला आहे. खवळलेल्या समुद्राचे पाणी वस्त्यांमध्ये घुसले असून, पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक मच्छीमारांच्या लहान नौका आणि मच्छीमार जाळ्या वाहून गेल्या आहेत.

विविध राज्यांतील सुमारे ७०० हून आधिक नौकांनी देवगड किनाऱ्यावर आश्रय घेतला आहे. वादळामुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. परिणामी भातशेती भुईसपाट झाली आहे. भातशेतीत पाणी साचले असून, पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला शुक्रवारी (ता. २५) पहाटे ‘क्यार’ चक्रीवादळ धडकले. या चक्रीवादळामुळे समुद्र खवळला असून, अजस्र लाटा किनारपट्टीला धडकत आहे.  उधाणाच्या लाटांचे पाणी सिंधुदुर्ग किल्ल्यासह, मेढा राजकोट, आचऱ्यातील जामडूल बेट, देवबाग येथील वस्तीत घुसले. शहरातील बंदर जेटी, मोरेश्‍वरवाडी, दांडी, तळाशील, तारकर्ली (ता. मालवण) किनारपट्टी भागालाही उधाणाचा फटका बसला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा मुठ, सुकटनवाडी, नवाबाग, केळूस या भागांनाही चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. येथील दांडी, तडाशील, देवबाग, मालवण येथील वस्त्यांमध्ये समुद्र लाटांचे पाणी घुसले आहे. अनेक मच्छीमारांच्या होड्या, जाळ्या उधाणाच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.

लाटांचे पाणी किनारपट्टीच्या रस्त्यावर आले आहे. पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे किनारपट्टीच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘क्यार’ चक्री वादळामुळे जिल्ह्यात जोरदार वारे वाहत असून, शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. वादळ आणि वारा यामुळे भातशेती भुईसपाट झाली आहे. पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे. या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, देवगड, वैभववाडी परिसरांतही जोरदार पाऊस झाला आहे. या भागात भातशेतीचे अधिक नुकसान झाले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT