अवकाळी पावसाने लिंबू बागेचे नुकसान झाले
अवकाळी पावसाने लिंबू बागेचे नुकसान झाले 
मुख्य बातम्या

अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाण

टीम अॅग्रोवन

अकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात मंगळवारी (ता. १६) दुपारी व रात्री झालेल्या अवकाळी पावसाने दाणादाण उडविली. पिकांचे मोठे नुकसान झाले असून निवडणुकीमुळे यंत्रणा मात्र बुधवारी (ता. १७) दुपारपर्यंत घटनास्थळांवर पोचल्या नव्हत्या. वादळ आणि जोरदार पाऊस, काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे बीजोत्पादन कांदा, फळबागा, गहू या पिकांचे नुकसान झाले. वीज पडल्याने पातूर तालुक्यात पळसखेड येथे लक्ष्मीबाई चव्हाण या महिलेचा मृत्यू झाला. 

अकोला जिल्ह्यात अकोल्यासह मूर्तिजापूर, पातूर, बार्शीटाकळी, तेल्हारा या तालुक्यात वादळी पाऊस झाला. बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. उजळेश्वर, काजळेश्वर, दोनद, पिंजर, राहीत, साहीत या पट्टयाला फटका बसला. मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी, निंभा, धोत्रा आदी गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. कानशिवणी परिसरात २० मिनिटे गारपीट झाली. यामुळे गहू, कांदा पिकाचे नुकसान झाले. तेल्हारा तालुक्यात पंचगव्हाण, वरुड बिहाडे या भागात हलक्या स्वरुपात गारपीट झाली.  

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आंबा, केळी, संत्रा, पपई, हळद, गहू व इतर भाजीपाला वर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे. बाळापूर, पातूर तालुक्यात लिंबू बागांमध्ये झाडे पडली. तोडणीला आलेली फळे गळाली. दुपारी शेतात गेलेल्या लताबाई चव्हाण (वय ३५) यांचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला. जळगाव जामोद (जि. बुलडाणा) तालुक्यात जळगाव येथे वीज पडल्याने दोन मुले गंभीर जखमी झाले.

 अकोट तालुक्यात अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बोर्डी परिसरात रात्री ८ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या भागात गारपीट सुद्धा झाली. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील केळी, संत्रा, आंबा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. बुलडाणा तसेच वाशीम जिल्ह्यातही काही भागात मंगळवारी रात्री मध्यम स्वरुपात व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT